आजकाल विहीर फार कमी जागी दिसते. वाढत्या शहरीकरणामुळे विहिरीचे अस्तित्व जणू हरवूनच गेले. पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी विहीर खणली जायची. स्वयंपाक, पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पूर्वी फक्त विहीरीच्याच पाण्याचा वापर केला जायचा. त्यानंतर नळ हे प्रकार आले आणि हळूहळू विहिरोचे महत्त्व कमी होऊ लागले. अनेकांनी आपल्या विहिरी बंद केल्या, पण काही विहिरी आजही अस्तित्वात आहेत. अशीच एक अत्यंत जुनी विहीर जंगलाच्या मध्यभागी सापडली आहे. ही विहीर फार खोल असल्याकारणाने यात नक्की काय आहे, ते पाहण्यसाठी यात जेव्हा कॅमेरा टाकून पाहिला तर त्यातून धक्कादायक दृश्ये समोर आली, जी पाहून सर्वांचाच थरकाप उडाला.
जगात असे काही लोक आहेत ज्यांना जुन्या गोष्टी शोधण्याचा, इतिहास जाणून घेण्याची फार हौस असते. त्यांना जुन्या गोष्टींचा अभ्यास करणे फार आवडते. अशातच आता एका अमेरिकेतील व्यक्तीने एका प्राचीन विहिरीचा शोध लावला. अमेरिकेन युट्युबर ॲक्वाचिगरने, मे 2022 मध्ये त्याच्या युट्युब चॅनेलवर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी त्याने या विहिरीबद्दल माहिती दिली आहे. यानुसार, ही एक फार जुनी दगडी विहीर आहे. जी खडक कापून बनवण्यात आली आहे. जंगलाच्या मध्यभागी बांधलेली ही विहीर संपूर्णपणे झाकलेली आहे. जेणेकरून त्यात कोणताही प्राणी पडू शकत नाही.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नागपूरच्या रस्त्यावर चक्क नग्न अवस्थेत उतरले जोडपे, Video Viral
व्हिडिओत जर आपण पाहिले तर दिसते की, व्यक्ती विहिरीच्या आत लाइट पेटवून पाहण्याचा प्रयत्न करतो, मात्र विहीर फार खोल असल्याकारणाने त्याला फार काही दिसत नाही. यांनतर त्याला आत नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा होते, ज्यासाठी तो आत काय आहे हे पाहण्यासाठी आपला कॅमेरा एका दोरीला अडकवून विहिरीच्या आत टाकतो. त्याने या विहिरीच्या आत गो प्रो कॅमेरा पाठवला. यांनतर या कॅमेरात धक्कादायक दृश्ये कैद झाली, जी पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.
विहीर झाकलेली होती तरीही यात काही भीतीदायक प्राणी दिसून आले. मात्र विहीर झाकलेली असतानाही हे प्राणी यात कसे गेले आणि हे प्राणी विहिरीत नक्की केव्हापासून राहत आहेत, हे अद्याप समजलेले नाही. याचा व्हिडिओ @Aquachigger नावाच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, GoPro पाण्याच्या विहिरीत टाकटाच भयंकर प्राणी दिसू लागले.