आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा 'हा' चविष्ट पदार्थ
राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या भाज्यांसोबतच फळांचे सुद्धा उत्पादन घेतले जाते. हंगामी फळे चवीला अतिशय सुंदर लागतात. वेगवेगळ्या ऋतूनुसार बाजारात हंगामी फळे सहज उपलब्ध होतात. त्यातील अनेकांना आवडणारे आंबट गोड चवीचे फळ म्हणजे पपनीस. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात पपनीस खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात थंडावा वाढतो. याशिवाय शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पपनीस खावे. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी अतिशय गुणकारी ठरते. पण अनेकांना पपनीस खायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पपनीस भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली पपनीस भेळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. यामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे मसाले आणि पदार्थ टाकू शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी