एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चक्क फाटक्या नोटा निघाल्या. हा प्रकार सोमवारी (दि. १८) घडला. एका ग्राहकाने एटीएममधून पैसे काढून मोजू लागला. तेव्हा तो अवाक् झाला, कारण एटीएममधून चक्क 500 रुपयांच्या 18 नोटा फाटक्या निघाल्या आणि सदर बाब लोकांना सांगताच एकच खळबळ उडाली.
नेरी व परिसरात चर्चेचा ठरला की एटीममध्ये फाटक्या नोटा आल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत अखिल भारतीय ग्राहक मंडळात सदर ग्राहकांनी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. चिमूर तालुक्यातील नेरी येथे एकमात्र शासकीय बँक ऑफ इंडियाची शाखा असून, याच बँकेत लाखो ग्राहकांची खाते आहेत. व्यवहार करताना बँकेचा त्रास कमी व्हावा आणि ग्राहकांना सोयीचे व्हावे, यासाठी बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम सुरू करण्यात आले.
हेदेखील वाचा : Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
दरम्यान, नेरी जवळील सिरपूर येथील शंकर जाधव नामक व्यक्ती बँक ऑफ इंडिया शाखेतील स्वतःच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले. त्याने बोलधने ज्वेलर्स जवळील बँकेचे एटीम गाठत दहा हजार रुपयांची रक्कम काढली असता त्यातील चक्क पाचशेच्या 18 नोटा फाटक्या निघाल्या. तेव्हा धसका बसला आणि नागरिकांना दाखविताच एकच खळबळ उडाली.
बँकेत गेल्यावर मिळाल्या नोटा बदलून
तात्काळ बँकेच्या शाखेत तक्रार करत नोटा दाखविताच बँकेच्या व्यवस्थापकांनी सदर नोटा बदलून दिल्या. मात्र, यात संपूर्ण दिवस गेल्याने ग्राहक यांचा मनस्ताप झाला. तेव्हा तात्काळ दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत अखिल भारतीय ग्राहक मंडळ नेरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.