
चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, बाईकवर बसून पती आणि पत्नी कुठे तरी जात असल्याचे दिसते. पण याचवेळी काही वादावादीमुळे पत्नी रागातच पतीचे केस पकडून त्याला एका मागोमाग कानशिलात हाणू लागते. या व्हिडीओमध्ये दिसते की, पती बाइक चालवत आहे आणि पत्नी मागे बसली आहे. अचानक ती पतीवर हल्ला करते आणि एकापाठोपाठ पातीवर थप्पडांचा वर्षाव करू लागते. लोकांनी जेव्हा या थप्पड मोजल्या तेव्हा लक्षात आले की, महिलेने 27 सेकंदात तब्बल 14 वेळा पतीला कानाखाली मारली आहे. व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, पत्नीने पतीला त्याच्या एक्ससोबत पकडल्यामुळे ती पतीला मारत आहे.
Kalesh b/w Couple on bike (Recorded by Kaleshi bois) pic.twitter.com/qlZnjH3Ops — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 12, 2026
अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बटाट्याऐवजी तो कांदा घेऊन आला असेल म्हणून बायको त्याला हाणत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हेल्मेट घातला असता तर या माणसाचे डोके वाचले असते. बाईक चालवताना हेल्मेट घालायला हवे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रोडवरच ही अवस्था आहे तर घरी तर मग ती त्याच्यासोबत काय करत असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.