फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रिल्स,भांडण, जुगाड आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरूणीने एक विचित्र स्टंट केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रील बनवण्याच्या नादात या तरूणीने आपला जीव धोक्यात तर घातला आहेच पण सोबतच रील बनवणाऱ्याचा पण. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही तर काहींनी संताप व्यक्त केले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे की, फेमस होणे जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का?
रेल्वे रूळांवर उभे राहून कांटा लगा गाणे म्हणत होती तरूणी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी रेल्वे रूळाच्या मधोमध उभी राहिलेली आहे. तिथेच एक रेल्वे प्लॅटफॉर्म देखील दिसत आहे. मात्र व्हिडिओतील तरूणी फक्त ऊभी नसून एक रील बनवत आहे. एक व्यक्ती तिची रिल बनवत आहे. या व्हिडिओमध्ये ती रूळाच्या मधोमध ऊभे राहून काटां लगा गाणे म्हणत आहे. ही तरूणी त्या गाण्यावर कोणतेच एक्सप्रेशन न देता गाणे म्हणत आहे. हा व्हिडिओ या मनोरंजक पद्धतीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर khushivideos1m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आमची चूक झाली दिदी तुम्हाला फॉलो करून तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे शाळेचे मैदान नाही, रेल्वे रूळ आहे, तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दिदी ट्रेन तर कांटा लगा ऐवजी, धक्का लगा गाणे म्हणा. तर अनेकांनी हिला मुर्खपणाचा कळस असे म्हटले आहे.
हे देखील वाचा- एक चूक अन्…! बाईकवर उभे राहून फटाके फोडत तरूणांचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.