फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे महिलांच्या भांडणांचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काही महिलांच्या भांडणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल महिलां अनेकदा खरेदी करायला गेल्यावर दुकानदाराशी मोल-भाव करतात. पण अनेकदा यातून वाद होतो आणि भांडण होण्यास सुरूवात होते. मात्र अनेकदा असही घडते की दोघांच्या भांडात तिसरा असा फसतो की त्याची सुटका होणे कठीण असते. सध्या असाच एक काही महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की त्या महिला एकमेकींचा जीव घेतील.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला दिवाळीची खरेदी करायला दुकानात गेल्या आहेत. ज्या दुकानात महिला खरेदीसाठी गेल्या आहेत त्या ठिकाणी दुकानदाराशी भांडायला लागतात. नंतर त्या महिला बाहेर येतात आणि एखमेकींशी वाद घालत असतात. इतक्यात तिथे एक तिसरी महिला येते आणि त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करते. मग त्या महिला तिच्याशी देखील भांडू लागतात. ती महिला आधी कानफाटात मारत आणि मग अचानक दुसरीचे केस उपटायला सुरूवात करते. त्या महिला दुकानातील सर्व सामान देखील फोडतात. या भांडणात मात्र दुकानदाराचे मोठे नुकसान होते. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
हे देखील वाचा- एक चूक अन्…! बाईकवर उभे राहून फटाके फोडत तरूणांचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w a Shopkeeper and Two Ladies (two girls are seen vandalising a woman’s shop and hitting her with a tubelight) Sadar Bazar, Agra
pic.twitter.com/L0KlBAQBCh— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 1, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दोघांच्या भांडात तिसरा तर फसलाच पण चौथ्याचे नुकसान झाले, आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्या महिलांकडून नुकसानाचे पैसै वसुल केले पाहिजेत. तिसरा एका युजरने म्हटले आहे की, या महिलां कधीही कुठेही सुरू होतात, बिचारा दुकानदाराचे किती नुकसान झालेय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- Viral Video: पोलिसांना बघताच तरूणाने केलं असे काही…; पाहून हसू आवरणार नाही
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.