फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही वर्षामध्ये लोकांना रिल बनवण्याचा रोग लागला आहे. कधी डान्स रील्स, कधी जुगाड तर कधी स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दितात. विशेषत: तरूण मुले-मुलींचा यामध्ये समावेश असतो. अनेकदा ही तरूण मंडळी सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे व्हिडिओ बनवतात ज्यामुळे त्यांच्या जीव देखील धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत या तरूणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तरूणांनी त्यांच्या जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबतच इतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा जीव देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या तरूणांनी धावत्या बाईकवर ऊभे राहून फटाके उडवले आहेत. या फटक्यांची एक ठिणगी केवढी महागात पडू शकते हे या तरूणांच्या लक्षात आलेले नाही.
बाईकवर ऊभे राहून धोकादायक स्टंट
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या महामार्गावरून दोन बाईक जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोन्ही बाईकवर दोन तरूण बसलेले आहेत. एका बाईकवर एक तरूण गाडी चालवत आहे तर एक तरूण मागे उभा आहे. मात्र तो तरूण कोणताही सपोर्ट न घेता बाईकवर ऊभा असून त्याच्या हातात फटाका आहे. आणि तो फटाका फोडत आहे. तर मागच्या बाजूस एक लालबत्ती असलेली गाडी आणि आणखी एक बाईक जाताना दिसत आहे. हे सगळे तिथूनच जाणाऱ्या एका माणसानी रेकॉर्ड केले आहे.
हे देखील वाचा- Viral Video: पोलिसांना बघताच तरूणाने केलं असे काही…; पाहून हसू आवरणार नाही
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला तरूणांचा धोकादायक स्टंट पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तरूणांचा हा स्टंट समाजात चूकीचा संदेश पोहोचवत आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dk_up_rider या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे की, पोलिस अशा लोकांवर कारावाई का करत नाहीत, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ एक ठिणगी अन्… खेळ संपला. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ अरे, आई-वडिलांचा तरी विचार करा अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
हे देखील वाचा – ‘चकली की चकला’, भावाने बनवलेली चकली पाहून बहिणीने धू धू धुतला…; पाहा मजेशीर व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.