Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
लग्न म्हणजे धमाल, डान्स, मजा मस्ती पाहायला मिळते. पण हीच मजा कधी कधी खूप महागात पडू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे. Viral Wedding Video
आणि तो पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतोय.लग्नाच्या स्टेजवर नवरा नवरी बसलेले असतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. मित्र मंडळी आजूबाजूला उभी राहून फोटो काढत असतात, मस्ती करत असतात. आणि तेवढ्यात नवरदेवाचा एक मित्र हातात ती फटाके उडवणारी फायर गन, जिला स्पार्कल गन पण म्हणतात, ती घेऊन येतो.त्याला वाटतं थोडं सेलिब्रेशन करूया, थोडा धुरळा उडवूया. तो थेट नवरीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तिच्या तोंडाजवळ ती गन चालवतो.Viral Video
गनमधून जोरात ठिणग्या बाहेर पडतात. त्या ठिणग्या थेट नवरीच्या चेहऱ्यावर आणि तिच्या केसांवर उडतात. आणि पुढच्याच क्षणी नवरीच्या केसांनी एकदम पेट घेतल्यासारखं वाटतं. केसांमध्ये आग लागल्याचं स्पष्ट दिसतंय व्हिडिओमध्ये. स्टेजवरचे लोक पण एकदम घाबरून जातात. काही कळायच्या आत सगळा गोंधळ उडतो. नवरी तर पुरती घाबरून जाते. हा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो बघितला आहे.
View this post on Instagram
आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा. अनेकजण कमेंटमध्ये म्हणत आहेत की हे AI ने बनवलेलं असू शकतं. कारण आजकाल AI ने असे व्हिडिओ सहज बनवता येतात. पण दुसरीकडे अनेक लोक म्हणत आहेत की हा व्हिडिओ खरा आहे आणि लग्नात अशा फालतू गोष्टी करू नयेत. फायर गन, ड्राय आईस, फटाके यांचा स्टेजवर वापर करणं खूप धोक्याचं आहे. नवरीने केसांवर स्प्रे मारलेला असतो, मेकअप असतो, त्यामुळे आग पटकन लागू शकते. नेटकऱ्यांनी तर त्या मित्राला चांगलंच झापलं आहे. एकाने लिहिलंय, मस्तीच्या नावाखाली जीवाशी खेळू नका. तर दुसरा म्हणतोय, सेलिब्रेशन करा पण दुसऱ्याच्या जीवाला धोका नको.






