लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री
Relationship Tips: एक ठराविक वय झालं की घरी आई-वडिलांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच जण ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाने डोक्याचा भुगा करून सोडतात. लग्नाच्या बाबतीत प्रत्येकाची काही वेगळी स्वप्नं असतात. तर आताची पिढी ही आई-बाबांनी सांगितलं आहे म्हणून लग्न करण्यातली तर अजिबातच नाहीये. बरं लग्न नक्की कधी करावं, आपला जोडीदार योग्य आहे की नाही असं १ ते १०० प्रश्न मनात असतात आणि याची उत्तरं नक्कीच आईबाबा नीटसं देतात असं या मुलांना वाटत नाही. वय कितीही असो, पण जेव्हा मनासारखा आणि समजून घेणारा जोडीदार भेटतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रवासाची खरी सुरुवात होते. मग आता नक्की योग्य जोडीदार कसा ठरवावा आणि लग्न कसं ठरवावं याबाबतच हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा
माणसातील प्रगल्भता ही महत्त्वाची असते. व्यक्ती फक्त वयाने नाही तर वागण्यानेही मॅच्युअर असावी. म्हणजे काय तर स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, संकटकाळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि संयम राखणे, आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे हे आपण ३-४ वेळा भेटून समोरच्या व्यक्तीबाबत समजून घ्यायला पाहिजे.
स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा खर्च पेलण्याची ताकद आपल्या जोडीदारामध्ये असायला हवी. आता दोघेही कमावते आहेत. पण दोघांनीही एकमेकांकडे या गोष्टी मनापासून बोलाव्यात. नोकरी, व्यवसाय, आयुष्यात उत्पन्नाचं साधन काय असणार हे सर्व बोललात तर भविष्यात येणारे ताण टाळता येऊ शकतात.
करिअर असो वा शिक्षण असो. आपण प्रत्येकाने काही ध्येयं ठरवलेलं असतं. ते एकमेकांसह बोलून मगच पुढचं पाऊल तुम्ही उचलू शकता. म्हणजे लग्नानंतर या गोष्टीचं दडपण येणार नाही.
लग्न म्हणजे काही मजा नाही. नव्या नऊ दिवसानंतर जबाबदारी येणारच असते आणि याची जाणीव ही दोन्ही जोडीदारांना असायलाच हवी. कुटुंबाचा मेळ, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असायला पाहिजे. दोघांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतील तर त्याचा ताळमेळ बसायला हवा. भविष्याबद्दलचा दृष्टीकोन जुळणारा असेल तर तफावत येत नाही आणि लग्न करण्याच्या दृष्टीने तुम्ही योग्य पाऊल उचलू शकता.
आपलं लग्न ज्या व्यक्तीशी होणार आहे त्याच्याशी वा तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. कोणतीही भीती वा संकोच बाळगून काहीच फायदा नाही. आपल्या मनात काय आहे हे समोरचा व्यक्ती नीट समजून घेत असेल तरच त्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो हे लक्षात ठेवा. यामध्ये एकमेकांविषयी आदर हवा आणि विश्वासही महत्त्वाचा आहे. तसंच कठीण प्रसंगात आपल्याला ही व्यक्ती साथ देईल याचीही खात्री करून घ्यायला हवी. तुम्हीही लग्न करणार असाल तर या गोष्टी नक्की तपासून पहा आणि त्यानुसारच पुढे पाऊल उचला. कोणाच्याही प्रेशरखाली इतका मोठा निर्णय घेऊ नका.
Ans: लग्नासाठी ठरावीक वयापेक्षा मानसिक तयारी, भावनिक स्थैर्य, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि नात्यात संवाद साधण्याची क्षमता महत्त्वाची आहे.
Ans: स्वभाव, विचारसरणी, मूल्ये, संवादाची पद्धत, करिअरविषयीचे विचार, आर्थिक नियोजन, कुटुंबाबद्दलची भूमिका आणि भविष्यातील अपेक्षा यांमध्ये सुसंगतता आहे का हे पाहावे.
Ans: एकमेकांमध्ये विश्वास, आदर, मोकळा संवाद आणि सुरक्षिततेची भावना असेल, मतभेद शांतपणे सोडवता येत असतील आणि भविष्यासंदर्भात मूलभूत अपेक्षा जुळत असतील तर नात्याची पायाभरणी चांगली असू शकते.






