Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-US War: १४ हजार किलो बॉम्ब, ७ बी-२ बॉम्बर्स, ३ अणुबॉम्ब साइट्स…; अमेरिकेने सांगितला इराणवरील हल्ल्याचा प्लॅन

इराणने अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले  आहे. तसेच,  हे पाऊल उचलून अमेरिकेने आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही अमेरिकला दिला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 23, 2025 | 10:07 AM
Israel-US War: १४ हजार किलो बॉम्ब, ७ बी-२ बॉम्बर्स, ३ अणुबॉम्ब साइट्स…; अमेरिकेने सांगितला इराणवरील हल्ल्याचा प्लॅन
Follow Us
Close
Follow Us:

Washington : अमेरिका इराण-इस्रायल युद्धात सामील झाली आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची कबुलीही दिली. यानंतर आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने इराणवरील हल्ल्याची संपूर्ण माहिती जगासमोर सादर केली आहे. अमेरिकेने हल्ल्यासाठी किती आणि कोणती शस्त्रे वापरली हे त्यात सांगितले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणी अणुस्थळांवर हल्ला करण्याच्या मोहिमेत १२५ विमानांचा समावेश होता. त्यात सात बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स होते. त्यांनी इराणच्या तिन्ही अणुऊर्जा केंद्रांवर १३,६०८ किलो वजनाचे बस्टर बॉम्ब टाकले. इराणच्या सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्र असलेल्या फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण साठा टाकण्यात आला.

हल्ल्यानंतर ट्रम्प यांची  धमकी

इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला धमकी दिली. हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले आहे आणि त्यावर बॉम्ब टाकले आहेत.  आता इराणने आता आपले अणुकार्यक्रम थांबवावेत आणि शांतता करार करावा. जर त्यांनी हे केले नाही तर आम्ही आणखी मोठे हल्ले करू.

इराणला स्वसंरक्षणाचा अधिकार

त्याच वेळी, इराणने अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले  आहे. तसेच,  हे पाऊल उचलून अमेरिकेने आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही अमेरिकेला दिला आहे.  या हल्ल्यानंतर, इराणला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की अमेरिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल आणि आता पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य असेल.

१३ जूनपासून इराणमध्ये ६५७, इस्रायलमध्ये २४ जणांचा मृत्यू

इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज १० वा दिवस आहे. अमेरिकास्थित ह्युमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या माहिती नुसार,  ४३० नागरिकांचा मृत्यू झाला आणि ३,५०० लोक जखमी झाले. तर, इस्रायलमध्ये २१ जूनपर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

 

Web Title: 14000 kg bombs 7 b 2 bombers 3 nuclear bomb sites america reveals plan to attack iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World War

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
3

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
4

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.