श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलं आहे. देश आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक समस्याचा सामना करत आहे. या पार्श्वभुमीवर श्रीलंकेतील सर्व कॅबिनेट 26 मंत्र्यांनी रविवारी रात्री तत्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने म्हणाले की, कॅबिनेट मंत्र्यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान गोटाबायो राजपक्षे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले आहेत. सामूहिक राजीनाम्या देण्याचे कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, राजकीय तज्ज्ञांनी सांगितले की, परकीय चलन साठा कमी झाल्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकट निर्माण झालं. यावेळी सरकारच्या कथित चुकीच्या हाताळणीमुळे मंत्र्यांवर प्रचंड दबाव होता. कर्फ्यू लागू असूनही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
[read_also content=”राष्ट्रवादीच्या मागे ‘ED पिडा’! आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ED चौकशी; शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केला 500 कोटींचा घोळ? https://www.navarashtra.com/crime/ed-interrogation-of-son-with-mla-babanrao-shinde-500-crore-by-taking-mutual-loans-in-the-name-of-farmers-263846.html”]