File Photo : Rain
दुबईनंतर आता पाकिस्तानातही पावसानं कहर (Pakistan Rain) केला आहे. पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गावांपासून शहरांपर्यंत अनेक भागात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गावापासून शहरापर्यंतच्या भागात पाणी साचल्याने दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून बचावकार्य सुरू आहे. सध्या देशातील काही भागात सततच्या पावसामुळे लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.
[read_also content=”ओडिशाच्या 50 जणांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/boat-carrying-50-people-capsized-in-odisha-one-dead-7missing-rescue-opration-continues-525567.html”]
पावसामुळे पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे घरांची पडझड झाली आहे. NDMA नुसार, देशभरात 2700 हून अधिक घरे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. पावसामुळे अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सध्या त्या लोकांना सरकारने शेल्टर होममध्ये ठेवले आहे.
प्रशासनाच्या दिलेल्या माहिती नुसार, पावसाने पाकिस्तानमध्ये आठवडाभरात मोठी उद्ध्वस्त केली आहे. पावसाच्या कहरात 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वीज पडणे, घर कोसळणे आणि पुरात बुडून सर्वाधिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान सरकार मदत पाठवत आहे.