स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Ahilyanagar Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र मोरे आणि त्यांचे समर्थक शिंदे गटात दाखल झाले.
मोरे यांच्या या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील आक्रमक, आंदोलनशील आणि धडाडीचे शेतकरी नेते अशी मोरे यांची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी सातत्याने लढा दिला होता.
Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
ऊसदर, वीजदर, हमीभाव आणि दुष्काळी मदतीसाठी ठिणगी उडवणारी आंदोलने करून जिल्ह्यात ताकद निर्माण करणारे रवींद्र (रवी) मोरे यांनी मंगळवारी रात्री संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे समर्थकांसह शिंदे गटात दाखल झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मोरे यांच्या प्रवेशावेळी त्यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मोरे यांच्या जाण्यामुळे नगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना नेतृत्वशून्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, मोरे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे शिवसेनेचा शिंदे गट मात्र जिल्ह्यात अधिक बळकट होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
Jalgaon Crime News : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला
“गेल्या वीस वर्षांपासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम केले. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आंदोलनांनी सुटत नाहीत. आता निर्णय घेण्याची ताकद हवी, म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात, म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असे रवींद्र मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सत्तेत राहून अधिक आक्रमक पद्धतीने काम करू. राजू शेट्टींनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले असून त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.