(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२७ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मनोरंजन जगतातील अनेक तारेही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. आज बुधवारी या खास प्रसंगी अनुपम खेर, करीना कपूर खान, कुणाल खेमू सारखे तारे त्यांच्या चाहत्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत. चाहत्यांना कोणकोणत्या मोठ्या सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
अनुपम खेर यांनी गणेश चतुर्थीच्या दिल्या शुभेच्छा
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ संदेशाद्वारे गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने लिहिले आहे की, ‘गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. गणेशजी तुम्हाला नेहमीच आनंद आणि शांती देवो. गणपती बाप्पा मोरया.’ असे लिहून अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा देऊन खुश केले आहे.
मिठाई नको, तांदूळ आणा! स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाचं थाटात स्वागत, पाहुण्यांना दिले आवाहन; म्हणाला…
कुणाल खेमूने देखील दिल्या शुभेच्छा
अभिनेता कुणाल खेमूने देखील त्याच्या कुटुंबासह गणपतीच्या दर्शनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्याने देखील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत सगळ्यांना आनंदी केले आहे.
करीना कपूर खाननेही शुभेच्छा दिल्या
अभिनेत्री करीना कपूरने देखील सोशल मीडियावर बाप्पाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बाप्पासोबत मोठ्या उत्साहात साजरा करूयात असे देखील अभिनेत्रीने म्हटले आहे.
शर्वरी वाघ म्हणाली- गणपती बाप्पा मोरया
अभिनेत्री शर्वरी वाघने देखील बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच तिच्या फोटोमध्ये तिची आई आणि बहीण देखील दिसत आहे. तसेच शेवटच्या फोटोमध्ये शर्वरीने मोदक देखील दाखवले आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनीही दिल्या शुभेच्छा
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सुंदर ड्रेसमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्रीचे शेअर केलेले सगळे फोटो खूप सुंदर आणि मोहक आहेत.