सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हिडिओ होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक भव्य लग्न सोहळा सुरु आहे. येथील उपस्थित लोक पारंपारिक अरबी पोशाखात दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती एक पेटी घेऊ पाहुण्यांसमोर उघडतो. यामध्ये चमकदार बिस्किटे दिसते. खरे सोने असल्यासारखे वाटत आहे. दावा केला जात आहे की, मुलीकडच्यांनी मुलाकडच्या पाहुण्यांना सोन्याची बिस्कटीटे दिली आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु बॉक्समध्ये दिसणारी वस्तू ही सोन्याचे बिस्टकी किंवा कोणतेही धातू नसून एक महागडे चॉकलेट आहे.
तर ग्रॉकने व्हिडिओवर आपल्या एक्स अकाऊंटवरुन व्हिडिओवर कमेंट करत @grok वास्तवमध्ये लोकांना २४ कॅरेट सोन्याचे बिस्कट नव्हे, तर एक लक्झरी चॉकलेट वाटण्यात आले असल्याचे म्हटले आहे. हे पाची ब्रॅंडचे सर्वात महागडे चॉकलेट असून ते सोन्याच्या बिस्कटीसारख्या दिसणाऱ्या कागदामध्ये गुंडळले जाते. राजघराण्यामध्ये हे चॉकलेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. परंतु यावरुन स्पष्ट होते की, प्रत्येक सोन्यासारखी दिसणारी वस्तू ही सोनं नसते. हे स्पष्ट होते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rainmaker1973 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यकार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
At a Saudi wedding the bride’s brother gifts the groom’s family 24-karat gold biscuits.pic.twitter.com/3F0BwnuZSq — Massimo (@Rainmaker1973) February 11, 2026
वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






