A war with India will not only harm Pakistan but also pose a great threat to Arab countries
India Pakistan war threat : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ पाकिस्तानच नव्हे, तर त्याच्यावर लष्करीदृष्ट्या अवलंबून असलेल्या अनेक अरब देशांसाठीही ही स्थिती धोकादायक ठरू शकते. भारताच्या तुलनेत आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाकिस्तानसाठी हे युद्ध अतिशय गंभीर ठरेल. परंतु, या संभाव्य संघर्षाचे परिणाम संपूर्ण खाडी भागात जाणवू शकतात.
पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये दीर्घकालीन लष्करी, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इस्लामिक देशांची संघटना OIC यामध्ये मध्यस्थी करत असली तरी पाकिस्तान स्वतःला इस्लामिक जगतातील एक आघाडीचा लष्करी भागीदार मानतो. सध्या पाकिस्तानचे सैन्य जवळपास २२ अरब देशांमध्ये कार्यरत आहे, जिथे ते लष्करी प्रशिक्षण, सल्ला आणि सामरिक सहकार्य पुरवते. त्यामुळे जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तर पाकिस्तानची लष्करी ताकद खचेल आणि त्यामुळे अरब देशांचीही सुरक्षा ढासळेल.
सैन्याची घटती ताकद, अरबांसाठी मोठा धोका
पाकिस्तानचे सैन्य अरब देशांमध्ये विशेषतः सौदी अरेबिया, युएई, कुवेत यांसारख्या राष्ट्रांमध्ये लष्करी अभ्यास आणि प्रशिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत असते. इतिहासातही १९६७ आणि १९७३ च्या अरब-इस्रायल युद्धात पाक वैमानिकांनी सहभागी होऊन महत्त्वाचे योगदान दिले होते. १९९० च्या आखाती युद्धात पाकिस्तानने जवळपास १०,००० सैनिक सौदी अरेबियाला पाठवले होते. तेथे त्यांची भूमिका रक्षणात्मक होती, विशेषतः मक्का आणि मदीना या पवित्र शहरांच्या सुरक्षेसाठी.
🚨.. is WAR IMMINENT
for INDIA & PAKISTAN🚨??🤔With this Pakistan and India Conflict being a threat now, this could ripple out globally affecting us more than you realise..
🪩Both economies, already facing challenges, would face long-term setbacks, with global trade and… pic.twitter.com/3blCdnpYF8
— HexLotus (@weirangelic) April 30, 2025
credit : social media
आजच्या घडीला इराण, येमेनमधील हुथी बंडखोर आणि इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांच्या वाढत्या धोक्यामुळे अरब देश पाकिस्तानसारख्या अनुभवी लष्करी भागीदारावर अधिक अवलंबून आहेत. जर पाकिस्तान युद्धामुळे दुर्बळ झाला, तर अरब राष्ट्रांची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात घटेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: भारताकडून हवाई क्षेत्र बंद तर पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती
सध्याचे युद्धसदृश वातावरण
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात तणावाचा कडेलोट झाला आहे. संयुक्त राष्ट्रांपासून ते अमेरिका आणि युरोपियन देशांपर्यंत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण जग युक्रेन, गाझा, सुदान, चीन-तैवान आणि अमेरिका-इराण संघर्षाच्या विळख्यात असताना भारत-पाकिस्तान युद्ध या आगीत तेल ओतण्याचे काम करू शकते.
अरब देशांसाठी ही परिस्थिती आणखी अवघड करणारी आहे. गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलविरोधी भावना उफाळून येत असताना, इराणने उघडपणे धमकी दिली आहे की अरब देशांनी अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांना त्यांच्या जमिनीवरुन परवानगी दिल्यास, त्यांच्यावरही क्षेपणास्त्र हल्ले होतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही पाकिस्तानसोबत आहोत…’ ज्यांच्यावर पाकिस्तानचा जास्त विश्वास, त्यांनीच उघड केलं गुपित
पाकिस्तानची अस्थिरता म्हणजे अरबांची असुरक्षा
या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया, युएई आणि कतारने भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, जर युद्ध झाले, तर पाकिस्तानची अस्थिरता केवळ दक्षिण आशियासाठीच नव्हे तर मध्यपूर्वेसाठीही मोठा धक्का ठरेल. त्यामुळे सध्याच्या जागतिक अस्थिरतेत, भारत-पाकिस्तानमधील शांतता केवळ दोन्ही देशांचे नव्हे, तर जगाच्या अनेक भागांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.