Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेची मोठी कारवाई! इराणसोबत काम करणाऱ्या भारताच्या ‘या’ कंपनीवर बंदी; नेमकं कारण काय?

अमेरिकेने इराणसोबत काम करणाऱ्या डझनभर कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये भारताच्या "गब्बारो शिप सर्व्हिसेस" कंपनीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. इराणने इस्रायलवर 1 ऑक्टोबरला केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 13, 2024 | 11:28 AM
इराणसोबत काम करणाऱ्या भारतीय कंपनीवर अमेरिकेने घातली बंदी

इराणसोबत काम करणाऱ्या भारतीय कंपनीवर अमेरिकेने घातली बंदी

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेने इराणसोबत काम करणाऱ्या डझनभर कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये भारताच्या “गब्बारो शिप सर्व्हिसेस” कंपनीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. इराणने इस्रायलवर 1 ऑक्टोबरला केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. इराणच्या तेल व्यापाराशी निगडित असलेल्या अनेक कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. गब्बारो शिप सर्व्हिसेस आशियाई देशांना इराणी तेल पुरवते, आणि याचा एक भाग असलेला हॉर्नेट टँकर अमेरिकेच्या दृष्टीने इराणच्या ‘भूतांच्या ताफ्याचा’ सदस्य मानला जातो, जो तेलाची तस्करी करतो.

या देशाच्या कंपन्यांवरही बंदी

या निर्बंधांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत या कंपन्यांना काम करता येणार नाही. यामध्ये UAE, मलेशिया, हाँगकाँग आणि सुरीनाममधील काही कंपन्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचा हल्ला इस्रायलमधील तेल अवीव सारख्या दाट लोकसंख्या असलेल्या भागांना लक्ष्य करून केला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे या हिंसात्मक कृतींना थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा- इराणचा ‘न्यूक्लीयर प्लॅन्ट’ नष्ट होणार? इस्रायल आखत आहे एक अत्यंत धोकादायक योजना

इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताच्या व्यापार क्षेत्रात मोठा परिणाम होऊ शकतो

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढल्यास त्याचा भारतावर आणि मध्यपूर्वेतील इतर देशांवरही परिणाम होऊ शकतो. भारत आणि इराणचे व्यापारी संबंध फार जुने आहेत. भारत मोठ्या प्रमाणावर इराणला बासमती तांदूळ आणि चहा निर्यात करतो, तसेच इराणकडून सूर्यफूल तेल आयात करतो. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये भारताने इराणला $680 दशलक्ष किमतीचा बासमती तांदूळ निर्यात केला होता. हा तांदूळ भारताच्या एकूण उत्पादनाच्या 19% आहे. जर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले, तर भारताच्या तांदूळ निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

त्याचप्रमाणे, इराणकडून आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलावरही परिणाम होईल, ज्यामुळे भारतातील तेलाच्या किंमती वाढू शकतात. युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम भारतावर आणि इतर आशियाई देशांवर होऊ शकतो.

हे देकील वाचा- दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा अँटी-टँक कमांडर ठार; प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करावर रॉकेट हल्ले

Web Title: America banned indian company working with iran nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • America
  • india
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी
1

Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी

अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल? दिवसाचे 23 तास तर आठवड्याचे 5 दिवस; US Stock Market रात्रीही सुरूच
2

अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल? दिवसाचे 23 तास तर आठवड्याचे 5 दिवस; US Stock Market रात्रीही सुरूच

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
3

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
4

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.