Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी

Yogi Adityanath, : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या राज्यात स्थलांतरण करणाऱ्या नागरिकांबाबत भाष्य केले आहे. आता उत्तरप्रदेशात व्यवसायाचे वातावरण निर्माण झाले असून कारागिरांनी मातीतच रोजगार भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 04, 2026 | 04:58 PM
Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी

Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणावर भाष्य
  • भदोहीच्या गालिच्याला मोठी मागणी
  • गालिच्याची परदेशातही चांगली विक्री
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, ज्या उत्तर प्रदेशातील कारागीर आणि हस्तशिल्पींना कधीकाळी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत होते, त्याच उत्तर प्रदेशात आज त्यांना आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. स्थानिक कामगारांना तंत्रज्ञान, डिझाइन आणि बाजारपेठेशी अधिक चांगली जोडणी तसेच सुरक्षितता मिळाली आहे. भदोहीच्या गालिच्याने आज जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचेही आदित्यनाथ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी संत रविदास नगर, भदोही येथील कार्पेट एक्स्पो मार्टमध्ये 4 ते 7 ऑक्टोबरपर्यंत आयोजित इंडिया कार्पेट एक्स्पोच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त उपस्थितांना संबोधित केले. या एक्स्पोमध्ये 227 पेक्षा जास्त एक्सिबिटर्स आणि 65 देशांतील 450 पेक्षा जास्त खरेदीदारांनी भाग घेतला आहे. यात ब्रिक्स देशातील 106 खरेरीदारांचाही समावेश आहे.

2017 आधी माफियागिरीचे राज्य

मुख्यमंत्री म्हणाले की, 2017 आधी उत्तर प्रदेशात हताशा व निराशा होती. दंगली, संचारबंदी, उपद्रव्य आणि माफियाराजमुळे व्यवसायाचे वातावरण नव्हते. कारागिरांना काम मिळत नव्हते. देश, परदेशातील खरेदीदारही येथे येत नव्हते. आमच्या सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेत भदोहीच्या गालिच्याचा समावेश करत कारागिरांना तांत्रिक, डिझाइन आणि बाजारपेठेशी जोडले.
संत रविदास नगर आणि सिल्क क्लस्टरमधून 6,100 कोटी रुपयांची निर्यात होत आहे. देशातील एकूण गालिच्याच्या निर्यातीत संत रविदास नगर, मिर्झापूर आणि वाराणसीमधून मखमली गालिच्याची भागिदारी 60 टक्के आहे. एकट्या संत रविदास नगरमधून 2,500 एमएसएमई यूनिटची निर्यात होते, ज्याचा वार्षिक टर्नओव्हर 10 हजार कोटी रुपये आहे. या उद्योगातून पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळत आहे.

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

गालिच्याला जीआय टॅग

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात तयार होणाऱ्या ९० टक्के गालिच्यांची अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनसह विविध देशांमध्ये निर्यात केली जाते. भदोहीच्या हस्तनिर्मित गालिच्याला जीआय टॅगही मिळाला आहे. कार्पेट आणि टेक्सटाइल तंत्रज्ञानातील तांत्रिक शिक्षण, डिझायनिंग आणि रंगकामाचे प्रशिक्षण देण्यासाठी भदोही येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चांगल्या दळणवळण सुविधांचा थेट लाभ गालिचा उद्योगाला मिळत आहे. गंगा एक्स्प्रेसवेचा विस्तार विंध्य एक्स्प्रेसवेच्या रूपात झाल्यानंतर संत रविदास नगरहून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा तासांत पोहोचता येणार आहे. विमानतळावरील कार्गो सुविधेमुळे भदोहीचे गालिचे जगभरातील बाजारपेठेत सहज पोहोचू शकतील. तसेच वाराणसी ते हल्दिया दरम्यान अंतर्देशीय जलमार्गाची सुविधा असून, वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कार्गो सुविधा उपलब्ध आहे.

बालसंगोपन रजेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी शिफारस! आता महिलांसोबत पुरुषांनाही मिळणार ‘चाइल्ड केअर लिव्ह’

Web Title: Yogi adityanath statement on migration for employment 1348134

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • America
  • Chief Minister Yogi Adityanath
  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल? दिवसाचे 23 तास तर आठवड्याचे 5 दिवस; US Stock Market रात्रीही सुरूच
1

अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल? दिवसाचे 23 तास तर आठवड्याचे 5 दिवस; US Stock Market रात्रीही सुरूच

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
2

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?
3

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.