फोटोे सौजन्य: सोशल मीडिया
बेरूत: इस्त्रायली लष्कर दक्षिण लेबनॉनमध्ये सतत विनाशकारी हल्ले करत आहे. इस्त्रायलच्या या हवाई हल्ल्यामध्ये हिजहुल्ल्हाचा आणखी एक कमांडर ठार झाला आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनच्या मेइस एल जबल भागात हिजबुल्लाह रदवान फोर्सेसच्या अँटी-टँक मिसाइल युनिटचा कमांडर अराइब अल-शोघा याला ठार मारल्याचा दावा केला आहे. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमध्ये अनेक टँकविरोधी क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी अल अरब जबाबदार होता. त्यामुळे त्याला ठार करण्यात आले.
इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांना नष्ट केले
इस्त्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या आणखी काही दहशतवाद्यांना देखील ठार केले असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांना नष्ट केले आहे. अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आणि अँटी-टँक कमांडर अल शोघाच्या हत्येनंतर म्हणून हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायलवर अनेक रॉकेट डागले.
इस्त्रायली हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हिजबुल्लाह हे हल्ले अप्पर गॅलीली भागात करण्यात आले आहेत. मात्र इस्त्रायला या हवाई हल्ल्यांची माहिती आधीच मिळाल्याने हे हल्ले लगेच थांबण्यात आले. त्यामुळे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. पण हिजबुल्लाचे लढवय्ये अजूनही इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. पण तरीही आम्ही या हल्ल्यांना घाबरणार नाही असे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.
इस्रायल आता बुलडोझरने हल्ले करत आहे
याशिवाय, इस्त्रायलने लेबनॉनच्या बिंट जबेल प्रांतातील काफ्रा येथील लष्करी चौकीजवळील इमारतींवर देखील हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यात लेबनीजचे दोन सैनिक ठार झाले तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच UNIFIL दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आता जमिनीमार्गे बुलडोझरने हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याचे बुलडोझर दक्षिण लेबनॉनमधील त्याच्या आणखी एका चौकीवर हल्ला करत आहेत. इस्त्रायली टँकने थेट त्याच्या मुख्यालयातील टॉवरवर गोळ्या झाडल्या, दोन इंडोनेशियन शांती सैनिक जखमी झाले. एवढेच नाही तर इस्त्रायली सैनिकांनी ज्या बंकरवर शांतता सैनिक आश्रय घेत होते त्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात वाहने आणि दळणवळण यंत्रणांचे नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा- इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश; नेमकं कारण काय?