America-Iran Conflict Iran unveils new solid-fueled ballistic missile
तेहरान: अमेरिका आणि इराणणध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालाल आहे. इराणचा अणु क्रार्यक्रमांवर ही चर्चा सुरु आहे. अमेरिका इराणला त्यांच्या अणु प्रकल्पांवर वारंवार हल्ला करण्याची धमकी देत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि अलीकडच्या अमेरिकेच्या धमकीला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. इराणच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी (04 मे) त्यांच्या नवीन घन इंधनयुक्त कासे बसीर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे लॉन्च केले. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी 17 एप्रिल रोजी करण्यात आली होती. हे क्षपणास्त्रे 1200 किमी पर्यंत जीपीएसशिवाय अचूकपण लक्षावर हल्ला करु शकते.
हे क्षपणास्त्रे अशा वेळी लॉन्च करण्यात आले जेव्हा इस्रायलच्या बेन गुरिनयन विमानतळावर हुथींनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला.
हुथींच्या आणि इराणच्या या कृतीमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संपप्त झाले आहेत. या हल्ल्याच्या प्रत्युत्तर दाखल नेतन्याहू यांनी हुथी आणि इराणी समर्थकांविरोधात मोठा बदला घेण्याची घोषणा केली आहे. लवकरच या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.
याच दरम्यान इराणच्या अणुकार्यक्रमांबद्दल सुरु असलेल्या चर्चा देखील रद्द करण्यात आली आहे. 03 मे रोजी ही चर्चा होणार होती. परंतु ओमानचे परराष्ट्र मंत्री यांनी ही चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान पुढील चर्चा कधी होणार याबाबद अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अणु क्रार्यक्रमांवर निर्बंध लादण्यासाठीच्या प्रयत्नात आहे. यासाठी ओमानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरु होती. परंतु या चर्चेला पुन्हा स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला येमेनमधील हुथींना पाठिंबा देण्यावरुन इशारा दिला होता. त्यांनी इराणला म्हटले होते की, आम्हाला माहित आहे तुम्ही काय रत आहात, आमचे तुमच्यावर लक्ष आहे. दरम्यान इराणने हुथींशी कोणत्याही प्रकारच्या संबंधांना नकार दिला होता.
याच दरम्यान अधिकारी नासीरजादेह यांनी देखील अमेरिका आणि इस्रायलला इराणवर हल्ला न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले होते की, असे झाल्यास इराण त्यांच्या लष्करी तळांवर आणि सान्यावर हल्ला करेल. तसेच त्यांनी येमेने एक स्वतंत्र्य राष्ट्र असल्याचेही म्हटले होते. इराणला त्यांच्याशी जोडण्याचा कोणताही प्रयत्न करु नका असे त्यांनी म्हटले होते.