America-Iran on the brink of war Will India be hit Know the details
सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी इराणला अणु कराराबाबत इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने अणुकरार स्वीकारला नाही तर, त्यांच्यावर जबरदस्त बॉम्ब हल्ले करण्यात येतील. ट्रम्प प्रशासनाने हिंद महासागरातील डिएगो गार्सिया मध्ये B-2 बॉम्बर तैनात केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आपले अंडरग्राउड क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मात्र याचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता आहे.
29 मार्च 2025 ला इस्त्रायलच्या माध्यमांनी काही सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितले की, हिंद महासागरात डिएगो गार्सियामध्ये 4 B-52 बॉम्बर्स प्लेन अमेरिकेने तैनात केले आहेत. इराणचे जवळपास सर्व शहरांना लक्ष्य करण्यात आले असून या बॉम्बरमध्ये 18 हजार किलो विस्फोटकची क्षमता आहे. हे शस्त्र त्याच्या लक्ष्यावर 200 किलोमीटर खोलपर्यंत हल्ला करुन शकते.
गेल्या काही काळापासून इराण अणु शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रकल्पांवर कार्य करत आहे. दरम्यान अमेरिकेसारख्या देशांना इराण या अणवस्त्रांचा वापर इतर देशांना नष्ट करु शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या अणू कार्यक्रमांवर आळा घालण्यासाठी काही निर्बंध लागू केले होते.
या निर्बंधांमुळे इराण मोठ्या संकटात आला होता. शिवाय दुसरीकडे इराण आर्थिक संकटाचा सामना करत होता. यावर उपाय म्हणून 2015 मध्ये अमेरिका आणि इतर पाच देशांनी रशिया, ब्रिटेन, फ्रान्स, चीन, जर्मनीने इराणसोबत जॉइंट कॉम्प्रेहेंसिव्ह प्लान ऑफ ॲक्शन (JCPOA) करार केला. या करारांनुसार इराणवरील तेल विक्रीचे आणि व्यापारावरील निर्बंध हटवण्यात आले. तर याबदल्यात इराणला युरेनियमचा साठा कमी करावा लागला, तसेच नंताज प्लाँट बंद करावा लागला. इराण आपल्या कार्यकर्मांवरील काही निर्बंध स्वीकारले होते. तसेच अमेरिकेने आर्थिक निर्बंध हटवले होते. मात्र, 2018 मध्ये ट्रम्प यांनी हा करार रद्द केला आणि इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले. परंतु यानंतर ही इराणने आपल्या अणु प्रकल्पांचे कार्य सुरुच ठेवले. दरम्यान पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इराणवर नवीन अणु प्रकल्प करार स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहे. मात्र इराणने कोणताही करार करण्यास नकार दिला आहे.
सध्या इराणच्या अणुउर्जेच्या वाढत्या क्षमतांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्याचा आरोप देखील आहे. सध्या इराण आणि अमेरिकेत वाढता तणाव पाहता संभाव्य युद्धाची शक्यता आहे.
दरम्यान व्यापार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास याचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. भारत मध्य पूर्वेतून 70% कच्च्या तेलाची गरज भागवतो. दरम्यान इराणवरील निर्बंधामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊन याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
शिवाय भारताने चाबहार बंदर प्रकल्पात गुंतवणूक केली असून अमेरिकेच्या निर्बंधामुळे हा भारत-इराण प्रकल्प धोक्यात येण्याची शक्यता आहे.तसेच इराणसारख्या खाडी देशांमध्ये लाखो भारतीय कामगार काम करतात. मात्र युद्धामुळे अस्थिरता निर्माण होऊन कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तसेच भारताचे अमेरिका, इस्रायल आणि इराणसोबतही चांगले संबंध आहे. परंतु युद्ध झाल्यास भारताला दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवणे कठीण जाऊ शकते. भारत युद्धात थेट सामील होण्याची शक्यता नसली तरही अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-अमेरिका अणुशक्ती बळकट होणार; १८ वर्षांनंतर करारला अंतिम मंजूरी