रशियन तेल खरेदीदारांना ट्रम्प यांचा आयात शुल्क लादण्याचा इशारा; भारतावार परिणाम होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत रशियन तेलावर टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती. यामागचे कारण म्हणजे पुतिन यांनी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर केलेल्या विधानामुळे ट्रम्प यांनी पुतिन यांना इशार दिला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीचा परिणाम भारतीय तेल खरेदीवर होण्याची शक्यता आहे. रशियाने यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला तर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली होती. यामुळे जागतिक तेल व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
गेल्या अनेक काळापासून रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. मार्च 2024 मध्ये भारताने सरासरी 18.5 लाख बॅरल प्रतिदिन तेल रशियातून आयात केले होते. हे फेब्रुवारीच्या तुलनेत अधिक होते. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणामुळे रशियन तेावर 20 ते 25% कर लादण्यात आले तर भारतासमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-अमेरिका अणुशक्ती बळकट होणार; १८ वर्षांनंतर करारला अंतिम मंजूरी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उद्यो तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, अमेरिकेने रशियन तेलावर कर लादला तर भारताला तेलाची खरेदी थांबवावी लागले. यामुळे भारत पुन्हा इराक आणि संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाकडून तेल आयात करण्यावर भर देईल.
शिवाय रशियने तेल स्वस्त असल्यामुळे बारताला मोठा फायदा होता. परंतु अमेरिकेने रशियन तेलावर कर लादल्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम देशातील महागाईवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.भारत इराण आणि व्हेनेझुएलामधून तेल खरेदी कमीकरत आहे, कारण त्यांच्यावर देखील अमेरिकेने निर्बंध लादले आहे. परंतु पुन्हा एकदा बारताला तेल खरेदीसाठी नवीन बाजारपेठ शोधण्याची गरजेचे ठरेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्वरित कर लादणार नसल्याचे संकेत दिले असले, तर तेल बाजार यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेल व्यापार तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, भविष्यात पुरवठा सुरळित राहील का नाही याची आशंका आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा धोऱमांवर मोठा परिमाण होण्याची शक्यता आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमती जगाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.