Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन स्पेशल फोर्सेस अधिकारी टेरेन्स जॅक्सनचा ढाक्यात गूढ मृत्यू; हेरगिरी नेटवर्कच बनले मृत्यूचा सापळा

Terrence Arvelle Jackson : बांगलादेशमध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याचा मृतदेह सापडण्याची ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बांगलादेश गेल्या वर्षी झालेल्या बंडातून सावरत आहे. बांगलादेशातील अनेक भाग अजूनही अस्थिर आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 03, 2025 | 02:00 PM
American Special Forces officer Terrence Jackson dies mysteriously in Dhaka

American Special Forces officer Terrence Jackson dies mysteriously in Dhaka

Follow Us
Close
Follow Us:

US national found dead Dhaka : बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक थरारक घटना घडली आहे. ढाका येथील पंचतारांकित वेस्टिन हॉटेल मध्ये अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेस कमांड (एअरबोर्न) चे अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आणि लगेचच संपूर्ण दक्षिण आशियात चर्चेचा विषय ठरली.

अचानक मृत्यू की नियोजित कारस्थान?

बांगलादेशी पोलिसांनी सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले. मात्र, मृतदेहाच्या वाहतुकीभोवती पसरलेली गुप्तता आणि अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे सामान ताब्यात घेतल्याने या कथेत नवा वळण आला. दूतावासाने स्थानिक पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली नाही. इतकेच नव्हे तर, हॉटेलमधून त्याच्या खोलीतून बाहेर काढलेले साहित्य पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. एका कर्मचाऱ्याने सांगितले की जॅक्सनच्या खोलीतून नकाशे, रेखाचित्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तीन मोठ्या सुटकेस, तसेच लॅपटॉप जप्त करण्यात आले. हे सर्व केवळ एक व्यावसायिक व्यक्तीच्या प्रवासातील सामान होते का? की त्यामागे गुप्तचर कारवायांचे जाळे दडले होते? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश

अधिकारी की व्यापारी?

जॅक्सन बांगलादेशात ‘व्यवसायिक दौर्‍यावर’ असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तपासात समोर आले की तो अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेसचा एक सेवारत अधिकारी होता. तो गेल्या २० वर्षांपासून अमेरिकन सैन्यात कार्यरत होता आणि २०२७ मध्ये निवृत्ती घेण्याचा त्याचा विचार होता. आशिया थिएटरमधील अनेक लढाऊ मोहिमांमध्ये त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. ही माहिती बाहेर आल्यानंतर, त्याचा बांगलादेशातील वावर नेमका कशासाठी होता, हा प्रश्न आणखी गडद झाला.

Indian intelligence agencies have expressed concern over the presence of a senior US Special Forces officer in Dhaka following the discovery of his body on August 31.
Terrence Arvelle Jackson was found dead in Room 808 of Westin Hotel in Dhaka.https://t.co/B8zZadZG8t pic.twitter.com/U7UluvN2JB

— SAMRIBackup (@SamriBackup) September 2, 2025

credit : social media

जॅक्सनच्या हालचालींवरून उलगडणारे संकेत

गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, जॅक्सनने गेल्या काही महिन्यांत चितगाव, कॉक्स बाजार, सिल्हेट आणि लालमोनिरहाट येथे वारंवार भेट दिली होती. ही सर्व ठिकाणे अतिरेकी कॉरिडॉर आणि सीमापार तस्करी मार्गांच्या जवळ ओळखली जातात. यामुळे असे मानले जात आहे की तो बांगलादेशातील इस्लामिक गटांवर आणि म्यानमारमधील अराकान आर्मीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर लक्ष ठेवत होता. त्याच्या हॉटेलमधून मिळालेल्या संवेदनशील साहित्यामुळेही हे स्पष्ट होते की जॅक्सन फक्त व्यावसायिक दौर्‍यावर नव्हता, तर तो गुप्त मिशनवर होता.

बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेशी संबंध?

बांगलादेश गेल्या वर्षी झालेल्या बंडानंतर अजूनही अस्थिरतेतून सावरत आहे. शेख हसीनाच्या सत्तापालटानंतर देशात राजकीय संकट वाढले आहे. अशा वेळी एका अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्याचा मृत्यू होणे ही केवळ योगायोगाची बाब नाही, असे तज्ज्ञ मानतात. पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांचे म्हणणे आहे की, “या मृत्यूमुळे बांगलादेश आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये नवी तणावरेषा निर्माण होऊ शकते. तसेच, दक्षिण आशियात अमेरिकेच्या गुप्त कारवायांची नवी दिशा उघड होते.”

मृत्यूमागे दडलेले हेरगिरी नेटवर्क?

सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, जॅक्सनचा मृत्यू हा अपघाती होता की नियोजित कट? अमेरिकन दूतावासाने शवविच्छेदन टाळणे आणि तातडीने त्याचे सर्व साहित्य जप्त करणे, यावरून काहीतरी लपवले जात आहे, असा संशय निर्माण झाला आहे. बांगलादेशातील गुप्तचर वर्तुळांमध्ये चर्चा सुरू आहे की जॅक्सन एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कमध्ये अडकला होता. या नेटवर्कचा संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवाद, मादक पदार्थांची तस्करी आणि दक्षिण आशियातील सामरिक घडामोडींशी असल्याचे मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अवकाशातील नवे रणांगण! अमेरिकेच्या सुरक्षेचा कणा ठरले ‘स्पेस फोर्स’ आणि ‘स्पेसकॉम’; पाहा का महत्वाचे?

पुढील पावले

सध्या अमेरिकन प्रशासन या घटनेवर मौन बाळगून आहे. बांगलादेशी माध्यमे मात्र याला “दक्षिण आशियातील नवा गुप्त अध्याय” असे नाव देत आहेत. येत्या काही दिवसांत याबाबत आणखी खुलासे होऊ शकतात, परंतु जॅक्सनच्या मृत्यूमुळे बांगलादेशात गुप्तचरांच्या हालचालींवर नवे प्रकाशझोत पडले आहे.

Web Title: American special forces officer terrence jackson found in dhaka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • Bangladesh News

संबंधित बातम्या

Maduro Bounty : व्हेनेझुएलावर अमेरिकेचा दबाव हा फक्त ड्रग्जमुळेच की यामागे आहे काही छुपा अजेंडा? वाचा सविस्तर…
1

Maduro Bounty : व्हेनेझुएलावर अमेरिकेचा दबाव हा फक्त ड्रग्जमुळेच की यामागे आहे काही छुपा अजेंडा? वाचा सविस्तर…

अवकाशातील नवे रणांगण! अमेरिकेच्या सुरक्षेचा कणा ठरले ‘स्पेस फोर्स’ आणि ‘स्पेसकॉम’; पाहा का महत्वाचे?
2

अवकाशातील नवे रणांगण! अमेरिकेच्या सुरक्षेचा कणा ठरले ‘स्पेस फोर्स’ आणि ‘स्पेसकॉम’; पाहा का महत्वाचे?

Power Of Siberia 2 : जागतिक ऊर्जा बाजारात नवी क्रांती; चीन-रशियाच्या ‘या’ ऐतिहासिक कराराने अमेरिकेला थेट आव्हान
3

Power Of Siberia 2 : जागतिक ऊर्जा बाजारात नवी क्रांती; चीन-रशियाच्या ‘या’ ऐतिहासिक कराराने अमेरिकेला थेट आव्हान

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले
4

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.