इटलीमध्ये एका रोमन जहाजाचे अवशेष सापडले असून, त्यातून २,००० वर्षांचा इतिहास उलगडला आहे. त्यातील वस्तू पाहून पुरातत्वशास्त्रज्ञ थक्क झाले. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इटलीच्या (Italy) किनाऱ्याजवळ पाण्याखाली दडलेला एक अद्भुत आणि ऐतिहासिक खजिना उघडकीस आला आहे. सिसिली (Sicily) बेटावरील माझारा डेल वालो (Mazara del Vallo) शहराच्या किनाऱ्याजवळ डायव्हर्सना समुद्राच्या तळाशी एका प्राचीन रोमन जहाजाचे अवशेष सापडले आहेत. प्राथमिक संशोधनानुसार, हे जहाज इसवी सन पूर्व दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातील (म्हणजेच सुमारे २,१०० वर्षे जुने) असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिकडच्या वर्षांतील हा पाण्याखालील सर्वात महत्त्वाचा पुरातत्वीय शोध (Underwater Archaeological Discovery) मानला जात असून, या शोधाने प्राचीन भूमध्य सागरी व्यापाराचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला आहे.
हे जहाज समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १५० फूट (४६ मीटर) खोलीवर सुरक्षितपणे विसावलेले आढळले. अहवालानुसार, जहाजाची लांबी अंदाजे ७० फूट (२१ मीटर) आणि रुंदी २० फूट (६ मीटर) इतकी आहे. जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे, २,००० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या जहाजातील अवशेष आणि तेथे साठवलेली भांडी अजूनही सुस्थितीत आहेत. पाण्याखालील प्रवाहात किंवा काळाच्या ओघात ही मौल्यवान भांडी फुटलेली नाहीत, ज्यामुळे संशोधकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोमन जहाजात ‘अँफोरा’ (Amphorae) नावाच्या मातीच्या उंच, निमुळत्या पेल्यांसारख्या शेकडो बरण्या सापडल्या आहेत. प्रामुख्याने ‘ड्रेसेल १ए’ (Dressel 1A) प्रकारच्या या बरण्यांचा वापर प्राचीन रोमन काळात वाइन, ऑलिव्ह ऑइल आणि धान्याची दूरवर वाहतूक करण्यासाठी केला जात असे. जहाजाच्या अवशेषांजवळ लोखंडी व शिशाचे दोन नांगर आणि इतर वस्तूही आढळल्या आहेत.
Scoperto al largo di Mazara del Vallo un relitto romano del II-I sec a.C., con centinaia di anfore.
«Una delle più importanti scoperte archeologiche subacquee degli ultimi anni», dichiara il Min Giuli, congratulandosi con @_Carabinieri_ Nucleo TPC e SopMare della Regione Sicilia pic.twitter.com/H1JbfX8MzF — Ministero della Cultura (@MiC_Italia) August 8, 2026
credit – social media and Twitter
सोशल मीडियावर या थरारक शोधाचा अनुभव शेअर करताना फ्री डायव्हर जियाकोमो डी मोला (Giacomo De Mola) याने लिहिले की, “समुद्र आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करतो. पाण्याच्या तळाशी जेव्हा मी ही मातीची भांडी पाहिली, तेव्हा माझा श्वासच थांबला. यावेळी आम्हाला केवळ एका जहाजाचे अवशेषच सापडले नाहीत, तर आपल्या प्राचीन मानवी इतिहासाचा एक जीवंत भागच सापडला आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IndiaAt80: भारत बनतोय जागतिक महासत्ता; स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिका आणि इस्रायलकडून पंतप्रधान मोदींना हार्दिक शुभेच्छा
या ऐतिहासिक शोधाची गांभीर्याने दखल घेत इटलीचे सांस्कृतिक मंत्री अलेसँड्रो गिउली (Alessandro Giuli) यांनी याला ‘अलिकडच्या वर्षांतील पाण्याखालील सर्वात महत्त्वाचा शोध’ घोषित केले आहे. गिउली यांनी सांगितले की, “समुद्र आपल्या इतिहासाचे मौल्यवान अंश सतत परत आणत आहे. माझारा डेल वालो जवळ सापडलेले हे अवशेष आपल्याला त्या काळातील व्यापारी मार्ग, संस्कृती आणि भूमध्य समुद्राला जागतिक संस्कृतीचे मिलनस्थान बनवणाऱ्या लोकांबद्दल सखोल माहिती देतात.”
इटलीच्या सांस्कृतिक वारसा संरक्षण पोलीस दल (Carabinieri TPC) आणि सिसिलीच्या सागरी विभागाच्या (Soprintendenza del Mare) संयुक्त पथकाद्वारे या संपूर्ण परिसराचे दस्तऐवजीकरण आणि त्रिमितीय मॅपिंग (3D Mapping) करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे जहाज अधिक सुरक्षित ठेवून त्याच्या संरक्षणासाठी आणि अभ्यासासाठी लवकरच पुढील शास्त्रीय मोहीम आखली जाणार आहे.

