
Asim Munir
मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष
मुनीर यांनी छावण्यांना भेट देत लष्करी अधिकारी, सैनिकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी युद्धाची तयारी देखील पाहिली. युद्धासाठी अचूवकता आणि जागरुकता आवश्यक असल्याचे त्यांनी सैन्याला म्हटले. मुनीर यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सीमा संघर्ष वाढला आहे. शिवाय ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर भारतासोबत देखील तणावात अधिक वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मुनीर यांची संरक्षण दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांनी सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना पाकिस्तान हे शांतता प्रिय राष्ट्र असून त्यांच्यावर कोणीही हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले होते. हा इशारा त्यांना भारताला आणि अफगाणिस्तानला दिला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या मुनीरच्या हातात तिन्ही दलांची ताकद आल्याने तीव्र संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवाय पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक निवदेनही जारी केले आहे, ज्यामध्ये मुनीर यांनी फील्ड ट्रेनिंग सराव आणि अॅडव्हान्स्ड सिम्युलेटर ट्रेनिंग फॅसिलीटीला भेट दिली आहे. त्यांनी सैन्याच्या तयारीचे कौतुक केले असून कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज राहण्याचे महत्त्वपूर्ण अधोरेखित केले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मीडियाने या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये मुनीर टॅंक, ड्रोन अशा लष्करी शस्त्रांचे निरिक्षण करताना दिसत आहेत. सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी अंतर्गत आणि बाह्य आव्हांनासाठी सज्ज राहण्यास सैन्याला सांगितले आहे.
मुनीर भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे संरक्षण प्रमुख झाल्यापासून अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी भारत आणि अफगाणिस्तानविरोधात भडकवणारी विधाने केली असून यातून युद्धाचा संकेत देण्याचा मुनीर प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुनीर यांनी पाकिस्तानचा भारत आणि अफगाणिस्तानशी लढण्याचा हेतू नाही, पण कोणीही हल्ला केल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले आहे. यामुळे भविष्यात तीव्र संघर्षाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
Ans: शनिवारी (१३ डिसेंबर) असीम मुनीर यांनी भारताच्या सीमेलगत असलेल्या पंजाब प्रांताता गुजरानवाल आणि सियालकोट छावणीला भेट दिली आहे.
Ans: असीम मुनीर यांनी भारताच्या सीमेलगत असलेल्या पंजाब प्रांताता गुजरानवाल आणि सियालकोट छावणीला भेट दिली असून यामुळे भारत-पाक तणाव, पाक-अफगाण तणावा वाढीचे आणि भविष्यात तीव्र संघर्षाचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.