Australia Federal Election Result 2025 Albanese re-elected as Australian Prime Minister; Big victory for Labor Party
कॅनबेरा: ऑस्ट्रेलियामध्ये संघीय निवडणुकांसाठी आज मतदान सुरु होते. यामध्ये या निवडणुकीमध्ये सध्याचे पंतप्रधान ॲंथनी अल्बनीज यांची लेबर पार्टी आणि विरोधी पक्षाचे नेते पीटर डटन यांच्या लिबरल-नॅशनलल कोलिशनमध्ये लढत पाहायला मिळाली. दरम्यान या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत ॲंथनी अल्बानीज यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहबे. अल्बनीज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले आहे. गेल्या तीस वर्षांत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 150 सदस्यांच्या प्रतिनिधी सभागृहात लेबर पक्षाने 70 जागा जिंकल्या आहेत. तर पीटर डटन यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ 24 जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान शनिवारी (03 मे) निकाल जाहीर झाल्यानंतर विरोध पक्षाचे लिबरल पक्षाचे नेते पीटर डटन यांनी पराभव स्वीकारला आहे. त्यांनी परभाव स्वीकारत अल्बानीज यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, या निवडणूक प्रचारात आपण चांगली कामगिरी करु शकलो नाही यांची मी संपूर्ण जबाबादारी घेतो.
लेबर पक्षाने निवडणुक प्रचारांदरम्यान महागाई, उर्जा धोरण आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चासारख्या मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी सरकारवर महागाई आणि व्याजदारी वाढीचा आरोप केला. बिलरल पक्षाचे नेते पीटर डटन यांनी सार्वजनिक क्षेत्रात कपात, अणुउर्जा या विषयांवर प्रचार केला. तर पंतप्रधान अल्बानीज यांनी पीटर डटन यांच्या धोरणांची तुलना ट्रम्प यांच्या धोरणांशी केली.
ऑस्ट्रेलियात 18 वर्षानंतरच्या व त्याहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना मतदान करणे अनिवार्य आहे. कोणत्याही अनावश्यक कारणास्तव एखाद्या व्यक्तीने मतदान व केल्यास त्याला 20 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड भरावा लागतो. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान पदासाठी वयाची कोणतीही अट नाही. 18 किंवा त्याहून अधिक वयाचे निवडणुक लढवनू देशाचे पंतप्रधान बनू शकतात.
ॲंथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे 31 वे पंतप्रधान आहेत. 2022 मध्ये त्यांनी स्कॉट मॅरिसन यांचा निवडणुकीत पराभव केला होता आणि सरकार स्थापने केले. त्यांनी सिडनी विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या राजकीय पर्वाची सुरुवात सिडनी विद्यापीठाच्या राजकारणातून झाली. 1960 मध्ये सिडनी वेस्ट मतदार संघारच त्यांची खासदार म्हणून निवड करण्यात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा त्यांचे पंतप्रधान पदी आगमन झाले आहे.