Pahalgam Terror Attack: '... तर आम्ही हल्ला करु' ; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची पुन्हा एकदा भारताला गिधड धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस चिघळत चालले आहेत. भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पाठिंबा आणि पर्यटकांवरली भ्याड हल्ल्यानंतर कडक कारवाई केली आहे. भारत सरकारने सिंघू जल करार, आया निर्यातआणि पाकिस्तानसोबतच्या सर्व प्रकराचे संबंध कमी केले आहेत. यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान वारंवार भारताला धमक्या देत आहे. दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताला गिधड धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचे म्हटले आहे. ख्वाजा यांनी म्हटवे आहे की, भारताने सिंधू नदीवर कोणत्याही प्रकारचे धरण बांधले आणि पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर याला पाकिस्तानवर थेट हल्ला मानला जाईल. सिंधू नदीवर धरण बांधणे दोन्ही देशांतील कराराचे उल्लघंन ठरेल. यानंतर पाकिस्तान शांत बसणार नाही. याचे योग्य प्रत्युत्तर देण्याच येईल. पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. संरक्षण मंत्री ख्वाजा यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांवरुन हे सिद्ध होत आहे की, पाकिस्तान दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे.
जिओ न्यूजला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी ही धमकी दिली. त्यांनी म्हटले की, एकतर्फी निर्णय हा सिंध कराराचे उल्लंघन आहे. भारताने पाणी थांबवण्यासाठी किंवा वळवण्यासाठी नदीवर कोणतेही कामकाज केले तर, बांधकाम पूर्णपणे नष्ट करण्यात येईल. त्यांनी म्हटले की, युद्ध केवळ तोफा आणि बंदुकांनी लढले जात नाही, पाणी थांबवणे हे देखील एक युद्ध आहे. पाण्याशिवाय लोक जगू शकत नाहीत.
भारताच्या कारवाई आधीच पाकिस्तानला महागात पडली आहे. भारताने सिंध जल करार थांबवला आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तसेच भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याची भीती देखील पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सिंध जल कराराला 25 कोटी पाकिस्तानी लोकांची जीवनरेख म्हणून संबोधले आणि भारतावर दबाव आणण्याची गरज व्यक्त केली.
यापूर्वी पाकिस्तानचे खासदार बिलवाल भुट्टो यांनीही भारताला सिंधू जल करारावरुन धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, सिंधू नदी पाकिस्तानची आहे, एकतर त्यात पाणी वाहिल किंवा त्यांचे रक्त. आता पुन्हा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री या मुद्द्यावरुन हल्ल्याची धमकी दते आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.