Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला

Nepal India Border : बालेन शाह यांच्या कृतींमुळे भारतीय सीमेवर अशांतता निर्माण झाली आहे, ज्यात कडक सीमा शुल्क आणि वाहन निर्बंधांचा समावेश आहे, आणि नेपाळमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 17, 2026 | 02:15 PM
balen shah nepal india border customs tax indian vehicle restrictions 2026

balen shah nepal india border customs tax indian vehicle restrictions 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बालेन शाह यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ की वाद?
  • १०० रुपयांवर टॅक्स
  • राजकीय रणकंदन

Balen Shah Nepal India border news : भारत आणि नेपाळमधील ( India-Nepal Relation) ऐतिहासिक ‘रोटी-बेटी’च्या संबंधांमध्ये सध्या बालेन शाह सरकारच्या एका निर्णयामुळे मोठी मिठाची गुळी पडली आहे. नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी सूत्रे हाती घेताच भारतीय सीमेवर अतिशय कडक नियम लागू केले आहेत. सीमा शुल्क (Customs) तपासणी नाक्यांवर नेपाळ पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून, भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वस्तूची आणि वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. या निर्णयामुळे केवळ भारत-नेपाळ सीमावर्ती व्यापारच नाही, तर दोन्ही देशांतील सामाजिक संबंधही धोक्यात आले आहेत.

१०० रुपयांच्या वस्तूलाही सुट्टी नाही!

बालेन शाह सरकारने घेतलेल्या सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एक म्हणजे सीमा शुल्कातील बदल. आता नेपाळमध्ये भारतातून आयात होणाऱ्या केवळ १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवरही अनिवार्यपणे सीमा शुल्क आकारले जात आहे. यापूर्वी सीमावर्ती भागातील नागरिक किरकोळ घरगुती सामान, कपडे किंवा अन्नपदार्थ भारतीय बाजारपेठेतून विनाशुल्क आणत असत. मात्र, स्थानिक नेपाळी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करत सरकारने ही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे सीमेलगतच्या भारतीय बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन

भारतीय वाहनांवर निर्बंधाचा ‘बडगा’

नेपाळच्या मधेश प्रांतात भारतीय नोंदणीकृत वाहनांच्या वाहतुकीवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नेपाळी अधिकाऱ्यांच्या मते, हजारो भारतीय वाहने विनापरवाना नेपाळमध्ये वापरली जात आहेत. आता भारतीय वाहनांसाठी खालीलप्रमाणे दैनिक शुल्क आकारले जात आहे:

  • चारचाकी वाहने: प्रति दिन ₹६००
  • तीनचाकी वाहने: प्रति दिन ₹४००
  • मोटारसायकल: प्रति दिन ₹२००

नियमांनुसार, भारतीय वाहनांना वर्षातून जास्तीत जास्त ३० दिवसच नेपाळमध्ये राहण्याची परवानगी आहे. मात्र, अनेक लोक एका दिवसाचा टॅक्स भरून महिनोन् महिने नेपाळमध्ये वाहने चालवत असल्याचे आढळले आहे. नेपाळ पोलिसांनी आता अशा वाहनांची धरपकड सुरू केली असून, यामुळे सामान्य नागरिक आणि राजकीय नेत्यांचीही अडचण झाली आहे.

In an unprecedented move, the newly formed #BalendraShah government in #Nepal has set up a five-member judicial panel to probe the assets of people who held public office from 2006 to the current fiscal year 2025-26, opening the widest scrutiny yet of the country’s post-monarchy… pic.twitter.com/7zCYkIpkR2 — The Times Of India (@timesofindia) April 17, 2026

credit – social media and Twitter

नेपाळमधील राजकीय पक्षांचा तीव्र विरोध

बालेन शाह यांच्या या निर्णयामुळे नेपाळमध्ये राजकीय वादळ उठले आहे. सीपीएन-यूएमएल (CPN-UML), राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष आणि जनता समाजवादी पक्षासारख्या बलाढ्य राजकीय पक्षांनी या कारवाईचा निषेध केला आहे. १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनात या पक्षांनी मागणी केली की, सीमेच्या ३० किलोमीटरच्या परिघात भारतीय वाहनांना मुक्तपणे फिरण्याची परवानगी द्यावी. निवडणुकांच्या काळात मधेशी भागातील राजकीय पक्ष प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय वाहनांवर अवलंबून असतात, त्यामुळे हा निर्णय शाह यांनी विरोधी पक्षांची ताकद कमी करण्यासाठी घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : एक मत अन् ठरलं जगाचं भवितव्य! रिपब्लिकनचा डेमोक्रॅट्सवर प्रहार; इराण युद्धावरून अमेरिका दोन भागात विभागली

सुरक्षेचे कारण की आर्थिक गरज?

नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, भारतीय क्रमांकाची वाहने गुन्हेगारी कृत्य, चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरली जातात. एकदा हे वाहन नेपाळबाहेर गेले की त्याचा मागोवा घेणे कठीण होते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पाळत ठेवणे आवश्यक आहे. सर्लाहीचे मुख्य जिल्हा अधिकारी रामुराज कडरिया यांनी स्पष्ट केले की, “आम्ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करत आहोत, सीमा शुल्क न भरता वाहन चालवणे बेकायदेशीर आहे.” मात्र, या निर्णयामुळे नेपाळमधील सर्वसामान्यांचे हाल होत असून, सीमेवरील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी दिवसाला किती कर भरावा लागतो?

    Ans: नेपाळमध्ये चारचाकीसाठी ₹६००, तीनचाकीसाठी ₹४०० आणि मोटारसायकलसाठी ₹२०० प्रति दिन इतका कर भरावा लागतो.

  • Que: बालेन शाह सरकारने सीमा शुल्कात काय बदल केले आहेत?

    Ans: आता भारतातून नेपाळमध्ये आणल्या जाणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक वस्तूवर सीमा शुल्क भरणे अनिवार्य केले आहे.

  • Que: भारतीय वाहनांना नेपाळमध्ये राहण्याचे नियम काय आहेत?

    Ans: भारतीय नोंदणीकृत वाहने वर्षातून जास्तीत जास्त ३० दिवस नेपाळमध्ये राहू शकतात आणि प्रत्येक दिवसासाठी त्यांना शुल्क भरावे लागते.

Web Title: Balen shah nepal india border customs tax indian vehicle restrictions 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Balen Shah
  • India-Nepal Relation
  • World news

संबंधित बातम्या

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार
1

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती
2

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले
3

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार
4

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.