Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर; 45 दिवसांत घेतले भारत विरोधी ‘हे’ चार निर्णय

२७ मार्च रोजी बालेन शाह यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. गेल्या ४५ दिवसांत त्यांनी भारतविरोधी मानले जाणारे चार निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी बालेन यांनी उघडपणे भारताला विरोध केला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 11, 2026 | 01:51 PM
balen shah nepal pm anti india decisions border rules 2026

balen shah nepal pm anti india decisions border rules 2026

Follow Us
Follow Us:
  • बालेन शाह यांचा आक्रमक पवित्रा
  • राजनैतिक तणाव
  • सीमेवर निर्बंध

Balen Shah Nepal PM Anti-India decisions : दक्षिण आशियातील भारताचा सर्वात जवळचा शेजारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. २७ मार्च रोजी बालेन शाह (Balen Shah) यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासूनच भारत-नेपाळ संबंधांमध्ये एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. बालेन शाह यांनी गेल्या ४५ दिवसांत घेतलेल्या निर्णयांवरून हे स्पष्ट होत आहे की, ते आपल्या ‘भारतविरोधी’ प्रतिमेवर ठाम आहेत. काठमांडूचे महापौर असताना ‘आदिपुरुष’ चित्रपटाला विरोध करणारे बालेन आता पंतप्रधान म्हणून भारतासमोर मोठी आव्हाने उभी करत आहेत.

१. राजनैतिक शिष्टाचार धाब्यावर: विक्रम मिस्री यांचा दौरा रद्द

बालेन शाह यांनी घेतलेला सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना भेटण्यास दिलेला नकार. वास्तविक, भारत आणि नेपाळमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मिस्री नेपाळला जाणार होते. परंतु, शाह यांनी आपण केवळ आपल्या समकक्षांनाच (पंतप्रधान स्तरावर) भेटू, असे सांगत हा दौरा धुडकावून लावला. एका परराष्ट्र सचिवाचा अशा प्रकारे अपमान करणे ही राजनैतिक वर्तुळात मोठी घटना मानली जात आहे. यामुळे भारताने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, अंतर्गत गोटात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Agni MIRV Missile: भारताचा ‘दिव्यास्त्र’ प्रहार! ड्रॅगनला बसला ताकदीचा जबरदस्त धक्का; गुप्तहेर जहाज तैनातीही ठरली निष्फळ

२. लिपुलेख आणि कालापानी वादाला पुन्हा फोडणी

नेपाळच्या नवीन सरकारने पुन्हा एकदा जुन्या सीमा वादाला हात घातला आहे. लिपुलेख आणि कालापानी हे प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असतानाही, बालेन शाह यांनी चीनच्या एका संदर्भाचा वापर करत यावर नेपाळचा दावा ठोकला आहे. केपी शर्मा ओली यांच्या काळात जो नकाशा वादाचा विषय ठरला होता, तोच अजेंडा बालेन पुढे रेटत आहेत. मानसरोवर यात्रेसंदर्भात बोलताना त्यांनी नेपाळचे हित सर्वात आधी असल्याचे सांगून भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

This was certain to happen but the tide will change. Balen Shah does not have the political capital or the military backing. This denial of a meeting with FS Misri or the land dispute are just political stunts and it is better to treat them as such. Balen Shah’s inexperience… https://t.co/U0fxVoS2eE pic.twitter.com/d4FUCUv4pf — The Unknown (@_TheUnknown007_) May 10, 2026

credit – social media and Twitter

३. तराई प्रदेशातील मधेसी नागरिकांची कोंडी

भारत-नेपाळ सीमेवर राहणाऱ्या मधेसी नागरिकांसाठी बालेन सरकारचा नवीन ‘कस्टम’ (सीमा शुल्क) नियम अत्यंत जाचक ठरत आहे. नेपाळमधील महागाईपासून वाचण्यासाठी हे नागरिक दररोजच्या जीवनावश्यक वस्तू भारतातून खरेदी करत असत. मात्र, आता १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल नेपाळमध्ये नेल्यास त्यावर कर भरावा लागणार आहे. यामुळे सीमावर्ती भागातील गरिबांना मोठा आर्थिक फटका बसला असून, जनसामान्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

४. ओपन बॉर्डरला आता पूर्णविराम?

भारत आणि नेपाळमध्ये १७५१ किलोमीटरची खुली सीमा आहे, जिथे कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टची गरज लागत नाही. मात्र, बालेन शाह यांनी आता प्रत्येक भारतीय नागरिकाला नेपाळमध्ये प्रवेश करताना ओळखपत्र सोबत ठेवणे आणि अनिवार्य सुरक्षा तपासणीतून जाणे बंधनकारक केले आहे. यामुळे या भागात व्यापार आणि पर्यटनासाठी येणाऱ्या भारतीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षा आणि नियम म्हणून हे पाऊल योग्य वाटत असले, तरी त्यामागील राजकीय हेतू हा भारताला त्रास देण्याचाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus : हळूहळू होणारा मृत्यू, रहस्यमय ताप आणि फुफ्फुसांमध्ये पाणी; जाणून घ्या किती धोकादायक आहे हंता विषाणू?

बालेन शाह यांचा पूर्वेतिहास आणि ‘ग्रेटर नेपाळ’

बालेन शाह हे केवळ राजकारणी नसून ते एक इंजिनिअर आणि रॅपरही आहेत. तरुणांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. २०२२ मध्ये त्यांनी ‘बृहत्तर नेपाळ’ (Greater Nepal) चा नकाशा शेअर केला होता, ज्यामध्ये भारताचे काही भाग नेपाळचा हिस्सा म्हणून दाखवण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांच्या मनात भारताबद्दल असलेल्या भूमिकेची कल्पना आली होती. आता पंतप्रधान म्हणून त्यांच्या हातात सत्ता आल्यावर ते हेच जुने मुद्दे अधिक आक्रमकपणे मांडत आहेत.

Web Title: Balen shah nepal pm anti india decisions border rules 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Balen Shah
  • India-Nepal Relation
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
1

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
2

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
3

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
4

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.