Bangladesh Court issues arrest warrant against Sheikh Hasina and her daughter
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या एका न्यायालयाने गुरुवारी (10 एप्रिल) भष्ट्राचाराच्या प्रकरणामध्ये हसीनांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांची मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि इतर आणखी 17 जणांविरुद्ध देखील नवीन अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या सर्वांवर फसवणूक करुन निवासी भूखंड मिळवल्याचा आरोप आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ढाका महानगरच्या वरिष्ठ न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. भष्ट्राचार विरोधी आयोगाने (ICC) ने हसीनांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. हे आरोपपत्र न्यायाधीशांनी स्वीकारले आहे. अशी माहिती ICC चे प्रतिनिधी वकिल मीर अहमद सलाम यांनी माध्यमांना दिली.
ICC ने म्हटले आहे की, राजधानी ढाकाच्या बाहेरील परबाचल परिसरात सरकारी विद्यापीठाने भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीशी संबंधित आरोपाखाली हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापूर्वी12 जानेवारी 2025 रोजी शेख हसीना आणि त्यांच्या सह-आरोपीं विरोधात न्यालयात खटला दाखल केला होता दरम्यान संबंधित आरोपाची सुन्वाणी 4 मे रोजी होणार असून न्यायालयाने ICC ला तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
यापूर्वी ढाका महानगरच्या वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी शेख हसीना यांच्या सुदासदन आणि भारतात निर्वासित असलेल्या कुटूंबाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. भष्ट्राचार विरोधी आयोगाच्या (ICC) अर्जाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. ख हसीना व्यतिरिक्त त्यांच्या मुलगा सजीब वाजेद जॉय, मुलगी सायमा वाजेद पुतुल, बहीण शेख रेहाना आणि त्यांच्या मुली ट्यूलिप सिद्दीकी आणि रदवान मुजीब यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आले होते.
आरोपपत्रानुसार, शेख हसीना यांच्या मुलीने चूकीच्या हेतूने भूखंड मिळवण्यासाठी शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाचा वापर केला. तसेच शेख हसीना यांच्यावर बांगलादेशातील आंदोलनादरम्यान झालेल्या हत्यांच्या गुन्ह्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांनी इतर अनेक देशांमध्येही आश्रयासाठी अर्ज दाखल केले होते परुंतु ते नाकारण्यात आले.