Open AI आणि एलॉन मस्क मधील वाद तीव्र; सॅम आल्टमन यांनी केले गंभीर आरोप, प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Open AI चे सीईओ आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्यात मोठा वाद सुरु आहे. हा वाद कायदेशीर झाला असून दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. बुधवारी (09 एप्रिल) न्यायालयात झालेल्या उत्तर याचिकेदरम्यान Open Ai आणि सीईओ सॅम आल्टमन यांनी एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मस्क यांच्यावर छळ आणि मानहानीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच न्यायालयाकडे मस्क यांच्या बेकायदेशीर आणि अयोग्य वर्तनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
Open AI ची स्थापना 2015 मध्ये एलॉन मस्क आणि सॅम आल्टमन यांनी केली होती. परुंतु 2023 मध्ये एलॉन मस्क OpenAI मधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:ची XAI कंपनी सुरु केली. मस्क यांनी आरोप केला होता की, ओपनएआय मानवतेच्या सेवेचे उद्देश बाजूला ठेवून फक्त नफा मिळवण्याठी काम करत आहे.
Elon’s nonstop actions against us are just bad-faith tactics to slow down OpenAI and seize control of the leading AI innovations for his personal benefit. Today, we counter-sued to stop him.
— OpenAI Newsroom (@OpenAINewsroom) April 9, 2025
मस्क यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना OpenAi ने म्हटले की, मस्क सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर करुन त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मस्क यांचे 200 दशलक्षहून अधिक फॉलोवर्स असून याचा वापर ते OpenAI कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आमच्यावर कायदेशीर रित्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, शिवाय कंपनीच्या अंतर्गत नोंदी देखील मागूण कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
OpenAI ने म्हटले आहे की, एलॉन मस्क कंपनीच्या विश्वासार्हतेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.यामुळे कंपनीच्या भविष्यातील योजनांना धोका निर्माण झाला आहे.
मस्क यांच्या वकिलांनी यावर उत्तर देताना म्हटले की, त्यांनी OpenAI ला 97.4 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्यांनी ही ऑफर गंभीर्याने घेतली नाही. OpenAIने म्हटले होते की, एलॉन मस्क यांचा हेतू आमच्या AI इनोव्हेशनवर वर नियंत्रण मिळवण्याचा आहे. सध्या हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.