
bangladesh ram statue controversy gaibandha temple construction stalled taslima nasreen protest
Bangladesh Ram statue controversy Gaibandha : बांगलादेशातून हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या धार्मिक अन्यायाची आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) उत्तरी भाग असलेल्या गायबांधा (Gaibandha) जिल्ह्यातील पलाशबारी उपजिल्ह्यात स्थित ऐतिहासिक ‘श्री श्री राधा गोविंद आणि काली मंदिर’ परिसरात उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे बांधकाम स्थानिक प्रशासनाने आणि मंदिर समितीने तात्काळ स्थगित केले आहे. हा प्रकल्प केवळ बांगलादेशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील प्रभू रामाच्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक मानला जात होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्थानिक इस्लामिक मूलतत्त्ववादी गट आणि संघटनांनी या पुतळ्याच्या उभारणीला हिंसक विरोध दर्शवल्यामुळे अखेर हे काम थांबवण्याची नामुष्की मंदिर समितीवर आली आहे.
या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुमारे २२० दशलक्ष बांगलादेशी टाका (अंदाजे ४० कोटी रुपये) खर्च करून एक भव्य ‘सनातन संकुल’ (Sanatan Complex) उभारले जात होते. यामध्ये प्रभू श्रीरामाची ८१ फूट उंच मुख्य मूर्ती, भगवान श्रीकृष्णाची ५० फूट आणि भगवान शंकराची ३० फूट उंचीची मूर्ती उभारण्याचे नियोजन होते. हे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच, स्थानिक कट्टरपंथी संघटना ‘इमाम उलेमा परिषद’ आणि ‘इन्साफ कायमकारी छात्र दल’ यांसारख्या गटांनी याविरुद्ध उग्र आंदोलन सुरू केले. त्यांनी ढाका-रंगपूर महामार्गावर मानवी साखळी तयार करून हे बांधकाम कायमचे पाडण्याची आणि मूर्ती उद्ध्वस्त करण्याची खुली धमकी दिली, ज्यामुळे स्थानिक हिंदू समाजात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी आणि आंदोलनादरम्यान कट्टरपंथियांकडून प्रभू रामाच्या प्रतिमांचा करण्यात आलेला अवमान याच्या निषेधार्थ बांगलादेशाची राजधानी ढाका (Dhaka) येथे तीव्र पडसाद उमटले आहेत. ढाका विद्यापीठातील शेकडो हिंदू विद्यार्थ्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यासाठी हातामध्ये पेटत्या मशाली घेऊन ‘शाहबाग चौकात’ (Shahbagh Square) रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘फ्रीडम ऑफ रिलिजन’च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : G7 Summit: जागतिक नेत्यांचे छुपे संभाषण Hot Micवर लीक; मेलोनींचे स्मोकिंग ते ट्रम्पच्या ग्रीनलँडवर गूढ गप्पा, पहा VIRAL VIDEO
विद्यार्थी नेते राम प्रसाद साहा आणि सुदीप्त प्रमाणिक यांनी आंदोलकांचे नेतृत्व करताना सांगितले की, “प्रभू श्रीराम हे आमच्यासाठी सर्वोच्च आराध्य दैवत आणि संस्कृतीचा मुख्य आधार आहेत. त्यांच्या मूर्तीचे बांधकाम रोखणे आणि त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.” काही कट्टरपंथी गट जाणीवपूर्वक अफवा पसरवून देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, जर दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून मंदिराच्या सुरक्षेची हमी दिली नाही, तर येत्या शुक्रवारी संपूर्ण देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे.
Now the ideological Prophet of Jamaat-e-Islami and its terror ecosystem in Bangladesh has spoken. “Traditionally, Ram did not occupy a particularly prominent place in the religious life of Bengali Hindus. Ram’s worship has been historically prevalent among certain communities in… https://t.co/ZOjd3rOwRv pic.twitter.com/otn0HEHyIV — Toofani 🇧🇩 (@Ekattor_71) June 15, 2026
credit – social media and Twitter
या संपूर्ण वादावर बांगलादेशातून हद्दपार झालेल्या प्रसिद्ध आणि डॅशिंग लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेश सरकारवर आणि बहुसंख्याक समाजावर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली आहे. तस्लिमा नसरीन यांनी विचारले की, “जर या देशात दररोज हजारो नव्या मशिदी अधिकृतपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय बांधल्या जाऊ शकतात, तर हिंदूंच्या ऐतिहासिक मंदिरात प्रभू रामाची मूर्ती बांधण्याला इतका तीव्र विरोध का केला जातोय? हा थेट अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांवर आणि मानवाधिकारांवर झालेला हल्ला आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, अशा धमक्या आणि द्वेषाचे वातावरण बांगलादेशला अंधकाराकडे घेऊन जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War : ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ कोणाची? अखेर ‘हा’ देश घेणार जागतिक अर्थव्यवस्था ताब्यात; अमेरिकेचा गुप्तचर अहवाल प्रसिद्ध
दुसरीकडे, मंदिराचे मुख्य सल्लागार श्यामलाल कुमार महंत यांनी अत्यंत हतबलतेने सांगितले की, “आम्ही देखील याच देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला सर्वांसोबत शांततेने राहायचे आहे. सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सध्या हे बांधकाम तात्पुरते स्थगित केले आहे. आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही.” परंतु, सनातन धर्माच्या स्थानिक अनुयायांनी थेट आरोप केला आहे की, हे केवळ सलोख्याचे कारण नसून, प्रशासनाने कट्टरपंथियांच्या धमक्यांपुढे शरणागती पत्करली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि ख्रिश्चन असोसिएशनने देखील या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, आज हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर गदा आली आहे, उद्या ती इतर अल्पसंख्याकांवरही येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.