Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खोटे बोलून तथ्य बदलणार नाही’; UN मध्ये पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर भारताची कडक प्रतिक्रीया

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष राजकीय आणि डिकॉलोनायझेशन बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरबाबत खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2024 | 06:30 PM
'खोटे बोलून तथ्य बदलणार नाही'; UN मध्ये पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर भारताची कडक प्रतिक्रीया

'खोटे बोलून तथ्य बदलणार नाही'; UN मध्ये पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर भारताची कडक प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी (8 नोव्हेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष राजकीय आणि डिकॉलोनायझेशन बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरबाबत खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष राजकीय आणि डिकॉलोनायझेशन समितीच्या बैठकीत पाकिस्तानला ठाम प्रत्युत्तर दिले. त्रिवेदी यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.”

पाकिस्तानच्या अशा खोट्या दाव्यांमुळे वास्तव बदलणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरला न्यूयॉर्क येथे झालेल्या या बैठकीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाचा (UNMOGIP) उल्लेख करून जम्मू-काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच निवडणुका झाल्या असून जनतेने लोकशाही मार्गाने नवीन सरकार निवडले आहे. पाकिस्तानच्या अशा खोट्या दाव्यांमुळे वास्तव बदलणार नाही आणि त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला.

हे देखील वाचा- ‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न’; भारताच्या सुरक्षा यंत्रेणसमोर मोठे आव्हान

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा मुद्दा उपस्थित

याशिवाय सुधांशू त्रिवेदी यांनी असेही स्पष्ट केले की, पाकिस्तानचे प्रयत्न संयुक्त राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण मंचावरून जागतिक लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. यावेळी पाकिस्तानकडून 1948 साली स्थापन केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे हे आज कालबाह्य ठरले असल्याचे नमूद केले. त्यांनी शिमला करारानंतर अस्तित्वात आलेल्या नियंत्रण रेषेचा उल्लेख करून UNMOGIP ची उपयुक्तता संपल्याचेही सांगितले.

While discussions in United Nations on UN Peacekeeping operations when the representative from Pakistan speaking on the same subject of UN peacekeeping, tried to digress the subject and unnecessarily mentioned that Pakistan’s involvement with UN peacekeepers started when UN has… pic.twitter.com/kbpycmEX2u — Dr. Sudhanshu Trivedi (@SudhanshuTrived) November 9, 2024


जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग 

या मुद्द्यावर ट्विटरवर पोस्ट करताना त्रिवेदी यांनी पाकिस्तानच्या प्रतिनीधीच्या प्रयत्नांना उघडपणे उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.” त्यांच्या या प्रतिउत्तरात भारतीय संसदेतील अन्य सदस्य, काँग्रेसचे राजीव शुक्ला, द्रमुकचे तिरुची शिवा आणि बीजेडीचे सस्मित पात्रा हे नेतेही सहभागी होते. भारताच्या या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला स्पष्ट संकेत मिळाला आहे की, भारतासाठी जम्मू-काश्मीरचा प्रश्न संपला आहे आणि तो केवळ भारताचा आंतरर्गत भाग आहे.

हे देकील वाचा- हिंदूंवरील हल्ल्यामुळे बांगलादेश सरकार अडचणीत; 800 पानांचा दस्ताऐवज आंतरराष्ट्रीय न्यायालयात

Web Title: Bjp leader sudhanshu trivedi slams pakistan at un session on jammu kashmir nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 06:30 PM

Topics:  

  • india
  • jammu kashmir
  • pakistan

संबंधित बातम्या

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!
1

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!

स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू
2

स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
3

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
4

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.