Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Sikh Attack: कॅनडात शीख वृद्धावर भीषण वंशद्वेषी हल्ला! भररस्त्यात शिवीगाळ अन् धक्काबुक्की; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Canada Sikh Attack : २२ एप्रिल रोजी कॅनडातील वुडस्टॉक येथे एका वृद्ध शीख व्यक्तीवर निर्घृणपणे वंशद्वेषी हल्ला करण्यात आला. एका तरुणाने त्यांना ढकलले आणि त्यांच्यावर वंशद्वेषी शिवीगाळ केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 25, 2026 | 12:46 PM
canada sikh elderly man attacked racist assault woodstock ontario arrested 2026

canada sikh elderly man attacked racist assault woodstock ontario arrested 2026

Follow Us
Follow Us:
  • कॅनडात द्वेषाचा नंगानाच
  • आरोपीला बेड्या
  • वांशिक तणाव वाढला

Canada Sikh Attack Woodstock 2026 : कॅनडासारख्या (Canada) प्रगत देशातून पुन्हा एकदा भारतीयांना आणि विशेषतः शीख समुदायाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ओंटारियो प्रांतातील वुडस्टॉक येथे एका वृद्ध शीख व्यक्तीवर झालेला वंशद्वेषी (Racist) हल्ला आता जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, ती वाढत्या वांशिक द्वेषाचे जळजळीत उदाहरण आहे.

भरदिवसा आणि भररस्त्यात ‘दहशत’

२२ एप्रिल रोजी सकाळी ११:३५ च्या सुमारास नाइट्स लेन परिसरात ही घटना घडली. पीडित वृद्ध गृहस्थ नेहमीप्रमाणे पदपथावरून चालत असताना एका मुखवटा घातलेल्या तरुणाने त्यांना रोखले. कोणत्याही कारणाशिवाय या तरुणाने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू माझ्या देशात काय करतोयस? इथून निघून जा!” अशा शब्दांत त्याने त्या वृद्धाचा अपमान केला. पीडित व्यक्तीने शांत राहून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोराने त्यांना वारंवार ढकलले आणि त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

पीडित वृद्धाचे धैर्य आणि पोलिसांची कारवाई

या संकटकाळातही पीडित शीख वृद्धाने आपला संयम गमावला नाही. त्यांनी हुशारीने आपल्या मोबाईलवर या सर्व प्रकाराचे रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ आता पुराव्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच वुडस्टॉक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आरोपी तरुणाने हल्ल्यानंतर जवळच्या टर्टल आयलंड स्कूलचे कुंपण ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्याला वेढा घालून अटक केली.

🚨 UPDATE: Woodstock Police have made an arrest following the harassment of a Sikh man. Local authorities confirmed the individual is now in custody. 📍 #Woodstock #Ontario pic.twitter.com/WRDu30uYcI — Manakdeep Singh Kharaud (@Iam_MKharaud) April 24, 2026

credit – social media and Twitter

कायदेशीर कारवाई आणि गंभीर आरोप

अटक करण्यात आलेल्या तरुणावर पोलिसांनी कडक कलमे लावली आहेत. यामध्ये विनाकारण हल्ला करणे, जीवे मारण्याची किंवा शारीरिक इजा करण्याची धमकी देणे आणि गुन्हेगारी छळ (Criminal Harassment) यांचा समावेश आहे. आरोपी तरुण अल्पवयीन असल्याने ‘बाल गुन्हेगार कायद्या’नुसार त्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तपासाअंती पोलिसांनी हे मान्य केले आहे की, हा हल्ला केवळ पीडित व्यक्तीच्या वांशिक ओळखीमुळे आणि धर्मामुळे करण्यात आला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर

जागतिक स्तरावर संताप

जागतिक शीख संघटनेने (World Sikh Organization) या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अशा प्रकारच्या घटना कॅनेडियन समाजातील वाढता तणाव दर्शवतात आणि हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.” या घटनेमुळे कॅनडात राहणाऱ्या स्थलांतरित भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे या घटनेचे डॅशकॅम फुटेज असेल तर त्यांनी ते पोलिसांशी शेअर करावे जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा देता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडातील ही घटना नेमकी कोठे घडली?

    Ans: ही घटना ओंटारियो प्रांतातील वुडस्टॉक शहरातील नाइट्स लेन परिसरात २२ एप्रिल रोजी घडली.

  • Que: आरोपीवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत?

    Ans: आरोपीवर हल्ला, जीवे मारण्याची धमकी आणि गुन्हेगारी छळ (Criminal Harassment) यांसारखे गंभीर आरोप लादण्यात आले आहेत.

  • Que: पीडित व्यक्तीची प्रकृती कशी आहे?

    Ans: सुदैवाने, या हल्ल्यात वृद्ध शीख व्यक्तीला कोणतीही मोठी शारीरिक इजा झालेली नाही, परंतु या घटनेमुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Web Title: Canada sikh elderly man attacked racist assault woodstock ontario arrested 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Canada
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.