Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chile Earthquake : उत्तर चिलीमध्ये भूकंपाचा जोरदार झटका; ६.९ रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Chile Earthquake : दक्षिण अमेरिका देश चिली पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवण्यात आली आहे. सुदैवाने, भूकंपाची खोली अधिक असल्याने त्सुनामीचा धोका टळला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 11:17 AM
Chile Earthquake

Chile Earthquake

Follow Us
Follow Us:
  • उत्तर चिलीमध्ये ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप
  • सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
  • त्सुनामीचा धोकाही नाही
Chile Earthquake news in Marathi : सांतियागो : दक्षिण अमेरिका देश चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली असून या शक्तीशाली भूकंपाने संपूर्ण चिली हादरवून सोडले आहे. सुदैवाने, भूकंपाची तीव्रता अधिक असूनही कोणत्याही प्रकारची जीविताहीन झालेली नाही. तसेच कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. याशिवाय त्सुनामीचा संभाव्य धोकाही नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अटाकामा वाळवंटात भूकंपाचे केंद्र

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपाचे केंद्र अटाकामा वाळवंटातील कलामा शहरापासून ३१ किलोमीटर दूरवर होते. याची खोली सुमारे १०० किमी होती. चिली विद्यापीठाच्या राष्ट्रीय भूकंप (Earthquake) विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी ५.५२ वाजता भूकंप झाला.

मोठी जीवितहानी टळली

चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता जास्त असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच यानंतर तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून कोणताही संभाव्य धोका नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

भूकंपाच्या केंद्रभागाची खोली अधिक असल्याने समुद्रात लाटा उसळून त्सुनामीचा धोकाही टळला आहे. सुरुवातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सरकारने कोणताही धोका नसल्याची माहिती देताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

चिलीमध्ये सतत का होतात भूंकप

भौगोलिक रचनेनुसार, चिली हा जगातील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. चिली नाझका प्लेट, दक्षिण अमेरिकन प्लेट आणि अंटार्क्टिक प्लेट अशा तीन मोठ्या प्लेट्सवर स्थित आहेत. या टेक्टॉनिक प्लेट्सच्या सतत घर्षणामुळे, वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे उर्जा बाहेर पडत आहे. ज्यामुळे ही उर्जा बाहेर पडताना जमिनीवर कंपणे जाणवू लागतात. यालाच आपण भूकंप म्हणतो.

चिलीतील भूकंपाच्या घटना

चिलीचा भूकंपाचा इतिहास अतिशय भयानक राहिलेला आहे. चिलीमध्ये १९६० साली वाल्दिविया येथे ९.५ तीव्रतेचा शक्तीशाली भूकंपाची नोंद झाली होती. यावेळी ९,५०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. तर २०१० मध्ये झालेल्या ८.८ तीव्रतेच्या जोरदार भूकंपात ५२० पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. २६ मे २०२६ रोजी देखील ६.९ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली, पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

भूकंपाने हादरला भारत! अफगाणिस्तानमध्ये 5.9 रिश्टर स्केलचा Earthquake; दिल्ली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिलीमध्ये भूकंपाची तीव्रता किती नोंदवण्यात आली?

    Ans: दक्षिण अमेरिका देश चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.

  • Que: या भूकंपामुळे चिलीमध्ये किती जीवितहानी झाली?

    Ans: चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली अधिक असल्याने कोणत्याही प्रकारे त्सुनामीचा धोका नाही. तसेच कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Web Title: Chile earthquake 6 9 magnitude earthquake hits northern chile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Earthquake News
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.