तैवानमध्ये भूकंपाचे धक्के
दक्षिण पूर्व भागात भूकंपाचे जोरदार धक्के
सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आली समोर
तैवानमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावरील तैतुंग भागात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्रीय हवामान प्रशासनाच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा तैतुंगच्या उत्तरेस 10 किलोमीटर खाली होता. यामुळे परिसरात भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवले. राजधानी आणि जवळील भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरांच्या, इमारतीच्या भिंती मोठ्या प्रमाणात हादरल्या.
24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडात भूगर्भीय हालचालींनी वेग घेतला आहे. गुरुवारी तैवानच्या हुआलियन शहरात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्याने तैवानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच, अफगाणिस्तान आणि भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यातही जमिनीला कंपने जाणवली आहेत. सुदैवाने, या नवीन धक्क्यांमुळे अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही.
Earthquake News : पृथ्वीच्या पोटात नेमकं काय चाललंय? ‘तैवान ते मणिपूर…’ 24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप केवळ १० किमी खोलीवर असल्याने त्याचे धक्के अधिक तीव्र होते. अफगाणिस्तानसाठी हे संकट नवीन नाही; ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या ६.३ तीव्रतेच्या भीषण भूकंपात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. हिंदूकुश प्रदेश हा भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरीच्या क्षेत्रात असल्याने येथे वारंवार भूकंप होत आहेत, असे रेड क्रॉस आणि युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने स्पष्ट केले आहे.






