'चीनच्या लडाखमधील 'या' कारवाया संबंध सुधारणाऱ्या नाहीत'; परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचा दावा, भारताची चिंता वाढली
सियोल: चीनच्या अव्साई चिन क्षेत्रातील हालचालींमुळे भारताची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने होटन प्रांतात दोन नवीन तालुका( महसुलीक क्षेत्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ रोबिंदर सचदेव यांनी सांगितले की, चीन प्रशासकीय धोरण राबवून अक्साई चिन क्षेत्रावर आपली पकड मजबूत करत आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
भारत-चीन संबंधात पुन्हा बिघाड होणार
तसेच, 3 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या निवेदनात सचदेव यांनी म्हटले आहे की, चीनच्या या कृती भारताशी संबंध सुधारण्याच्या दिशेने नाहीत, तर संघर्ष कायम ठेवण्याच्या आहेत. चीनने होटन प्रांतात यापूर्वी सात तालुका( महसुली क्षेत्र) होत्या, आता त्या संख्येत आणखी दोनची भर घातली आहे. या महसुली क्षेत्रात स्वतःची प्रशासकीय राजधानी असेल, यामुळे चीन आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सचदेव यांच्या मते, चीन भारतासोबत संबंध सुधारण्याच्या मनःस्थितीत नाही, उलट त्याने अक्साई चिन क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
भारतात या अडचणी निर्माण होणार
याशिवाय, चीनने ब्रह्मपुत्र नदीवर प्रस्तावित बांध प्रकल्प भारतासाठी मोठी चिंता निर्माण करतोय. या प्रकल्पामुळे भारतात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते, तसेच सिंचनासाठीही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सचदेव यांनी या प्रकल्पाची एकूण किंमत 140 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले. हा प्रकल्प इतका मोठा आहे की तो भारतासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो.
भारताकडून चीनच्या अवैध ताव्याला मान्यता नाही
भारताने यापूर्वीही अक्साई चिनवर चीनच्या ‘अवैध’ताब्याला मान्यता दिलेली नाही तरीही चीनच्या कारवाया अजूनही सुरुच आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले की, होटन प्रांतात नवीन क्षेत्र स्थापन करण्याचा चीनचा निर्णय भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम करणार नाही. चीनचा हा निर्णय त्यांच्या अवैध ताब्यास वैधता देऊ शकत नाही.
भारताचे धोरण
भारताचे धोरण शांतता राखण्याचे आहे, मात्र चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे भारताला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अक्साई चिन व ब्रह्मपुत्र नदीवरील प्रस्तावित प्रकल्पामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. चीनच्या या हालचालींमुळे भारत-चीन संबंध सुधारण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. दुसरीकडे चीन आणि बांगलादेशातील वाढते मैत्रीचे संबंध देखील भारतासाठी धोकादायक असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. बांगलादेशचे आर्मी चीफ वकार-उज-जमान यांनी चीनला बांगलादेशच्या विकासात महत्त्वाचा भागीदार म्हणून संबोधले आहे.