Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात चिन्मय दास यांच्या अटकेवरून संघर्ष; एका वकिलाचा मृत्यू, तपासाचे आदेश

बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रमुख आणि ISKCON चे सचिव चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील तणाव आणखी वाढला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2024 | 06:15 PM
Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात चिन्मय दास यांच्या अटकेवरून संघर्ष; एका वकिलाचा मृत्यू, तपासाचे आदेश

Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात चिन्मय दास यांच्या अटकेवरून संघर्ष; एका वकिलाचा मृत्यू, तपासाचे आदेश

Follow Us
Follow Us:

ढाका: बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रमुख आणि ISKCON चे सचिव चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर हिंदू समाजातील लोकांनी तीव्र निषेध करत अनेक निदर्शने काढली. तसेच  ISKCON ने त्यांच्या जामीनासाठी न्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका बांगलादेश न्यालयाने फेटाळून लावली. त्यानंतर देखील हिंदू लोकांनी आंदोलन केले. या संघर्षादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दास यांच्या अटकेवरुन बांगलादेशाच्या चितगाव  या शहराजळ झालेल्या संघर्षात या वकिलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चितगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, चितगावमध्ये वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची हत्या करण्यात आली. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगात पाठवण्याचे बांगलादेश न्यायालयाचे आदेश

मीडिया रिपोर्टनुसार, चितगाव बार असोसिएशनचे महासचिव अशरफ हुसैन रज्जाक यांनी सांगितले आहे की, इस्लाम अलिफची निर्घृण हत्या करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, न्यायालयीन कामकाज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घटनेमुळे चितगावसह संपूर्ण बांगलादेशात तणाव निर्माण झाला आहे. कायदा अंमलबजावणी यंत्रणा हाय अलर्टवर असून, राजधानी ढाका आणि चितगावमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. चिन्मय दास यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी हजारो लोक न्यायालयाबाहेर जमले आहेत.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

चिन्मय ब्रह्मचारींच्या अटकेमुळे तणाव

चितगाव न्यायालयात चिन्मय ब्रह्मचारी यांच्या अटकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. त्यांच्या जामीन अर्ज फेटाळल्यानंतर निदर्शकांनी जेल व्हॅन अडवली. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचे गोळे आणि सोनिक ग्रेनेडचा वापर केला. संघर्षानंतर चिन्मय ब्रह्मचारींना तुरुंगात पाठवण्यात आले. चिन्मय ब्रह्मचारींवर बांगलादेशी राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा आरोप ठेवून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीने याप्रकरणातून माघार घेतल्याने खटल्याची सत्यता प्रश्नचिन्हाखाली आहे.

हत्येच्या तपासाचे आदेश

चितगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश सरकारने तणावग्रस्त भागांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मुहम्मद युनूस यांनी वकिलाच्या हत्येचा निषेध केला असून, सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. शांतता राखण्याचे आवाहन करत, युनूस यांनी जातीय सलोखा कायम ठेवण्यावर भर दिला आहे. चितगावमधील वकिलाच्या हत्येमुळे आणि चिन्मय दास यांच्या अटकेमुळे देशातील धार्मिक तणाव चिघळला आहे, ज्यामुळे सरकार आणि अल्पसंख्याक समुदायांमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनी विमाने तैवानच्या हवाई हद्दीत; सलग तिसऱ्या दिवशीही घुसखोरी, अमेरिकेच्या हालचालींवर चीनची नजर

Web Title: Death of a lawyer due to clashes over chinmay das arrest in bangladesh nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • Bangladesh
  • world

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Bangladesh Bomb Blast : बांगलादेश हादरला! NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ; हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण
2

Bangladesh Bomb Blast : बांगलादेश हादरला! NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ; हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण

Measles: बांगलादेशमध्ये गोवरचा कहर! 24 तासांत 7 चिमुरड्यांचा मृत्यू; मृतांची संख्या 738 वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेला हादरा
3

Measles: बांगलादेशमध्ये गोवरचा कहर! 24 तासांत 7 चिमुरड्यांचा मृत्यू; मृतांची संख्या 738 वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेला हादरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.