फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तैपी: चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलग तिसऱ्या दिवशी चिनी लष्करी हालचालींनी तैवानची सुरक्षा चिंता वाढवली आहे. तैवानच्या सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 चिमी विमाने आणि 7 जहाजे तैवानच्या सीमेजवळ दिसली आहेत. यापैकी 10 विमाने तैवानच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही घुसखोरी चीनकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण लष्करी कारवायांचा बाग असल्याचे तैवानने म्हटले आहे.
याआधीही चीनने तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती
याआधीहीही चीनने अशाच प्रकारे तैवानच्या सीमेत घुसखोरी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 5 चिनी विमाने आणि 7 जहाजे तैवानच्या जवळ आली, त्यातील 4 विमाने तैवानच्या हवाई हद्दीत गेली होती. याशिवाय, 12 चिनी विमाने आणि 7 जहाजांनी सीमाशुल्क उल्लंघन केले. या घटनांमुळे तैवानने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच तैवानने चीनला इशाराही दिला आहे की, त्यांनी पुन्हा असे केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
अमेरिकन लष्करी हालचालींवर चीनचे लक्ष्य
मीडिया रिपोर्टनुसार, चीन अमेरिकन लष्करी हालचालींवर देखरेख करत असल्याचे दिसते. काल अमेरिकन नौदलाच्या 7व्या फ्लीटच्या P-8A पोसेडॉन विमानाने चीन आणि तैवान दरम्यानच्या सागरी मार्गावरून उड्डाण केले. यावर चीनने आक्षेप घेतला असून, अमेरिकेची ही कृती प्रादेशिक शांततेला धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने आपल्या कारवायांचे आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत समर्थन केले आहे.चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या वादात अमेरिका हा तैवानला सर्वात मोठा शस्त्रास्त्रे पुरवणारा देश आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तैवानकडून होणाऱ्या पुस्तकांवर चीनकडून बंदी
याशिवाय, चीनने तैवानकडून निर्यात होणाऱ्या काही पुस्तकांवर देखील बंदी घातली आहे. या पुस्तकांमध्ये तैवानला स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते आणि दक्षिण चीन समुद्राचा उल्लेख चीनच्या भूभागाचा भाग म्हणून नव्हता. चीनने या पुस्तकांवर “वन चायना तत्त्वाचे उल्लंघन” केल्याचा आरोप केला आहे. जप्त करण्यात आलेली पुस्तके तैवानमधील शाळांसाठी होती. चीनच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तैवानच्या पुस्तकांमध्ये वादग्रस्त नकाशे असून यामध्ये तैवान हा वेगळा देश असल्याचे दाखवण्यात आले आहे.
तैवानमधील सुरक्षा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, चीनच्या या घुसखोरीने जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचा तैवानला पाठिंबा असल्याने चीन-तैवान वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.