Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढाकाच्या ‘या’ निर्णयाने आणखी बिघडले भारत-बांगलादेश संबंध; काय आहे नेमकं प्रकरण?

India-Bangladesh Relations: बांगलादेश-भारत संबंध अधिकच चिघळत चालले आहेत. ढाकाने भारताच्या हवामान हवामान विभागाच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2025 | 04:41 PM
ढाकाच्या 'या' निर्णयाने आणखी बिघडले भारत-बांगलादेश संबंध, काय आहे नेमकं प्रकरण?

ढाकाच्या 'या' निर्णयाने आणखी बिघडले भारत-बांगलादेश संबंध, काय आहे नेमकं प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेश-भारत संबंध अधिकच चिघळत चालले आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. यामागचे कारण म्हणजे ढाकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ढाकाने नवी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यापूर्वीही बांगलादेशने भारतीय न्यायाधीशांच्या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. बांगलादेशच्या या निर्णयाने भारतासोबतचे संबंध अधिक तणावात चालले आहेत.

सहभागी न होण्यामागचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार देताना यामागचे कारणही सांगितले आहे, बांगलादेश सरकारने हा निर्णय सरकारी खर्चावर अनावश्यक परदेश दौऱ्यांवर मर्यादा आणण्याच्या धोरणामुळे घेतल्याचे सांगितले आहे. भारताच्या हवामान विभागाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी होण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण…’; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण

बांगलादेशने हवामान विभागाचे (BMD)संचालक मोमिनुल इस्लाम यांनी IMD कडून निमंत्रण मिळाल्याची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, “भारत हवामान विभागाने 150व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले आहे. आमचे भारताशी चांगले संबंध आहेत आणि हवामान खात्यांदरम्यान सहकार्य सुरू राहील.” मात्र, सरकारी धोरणामुळे या सोहळ्यात सहभागी होणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

IMD च्या सोहळ्यासाठी अनेक देशांना निमंत्रण

भारत हवामान विभागाने बांगलादेशासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव यांसारख्या देशांना निमंत्रित केले आहे. IMD च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, “आम्ही 150 वर्षांपूर्वी IMD च्या स्थापनेच्या वेळी भारताचा भाग असलेल्या सर्व देशांना आमंत्रित केले आहे.” पाकिस्तान या सोहळ्यात सहभागी होण्यास तयार असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे, मात्र बांगलादेशकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

IMD चा ऐतिहासिक प्रवास

ब्रिटिश राजवटीत 1875 साली IMD ची स्थापना चक्रीवादळे आणि मान्सूनच्या आपत्तीमुळे करण्यात आली. कोलकात्यात सुरुवातीला IMD चे मुख्यालय होते. कालांतराने हे मुख्यालय शिमला, पुणे आणि शेवटी दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आले. 15 जानेवारी 2025 रोजी IMD आपली 150वी वर्धापन दिन सोहळा साजरा करणार आहे. बांगलादेशच्या या निर्णयामुळे भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देश हवामान शास्त्राच्या क्षेत्रात सहकार्य करत असले तरी बांगलादेशाचा पाकिस्तानकडे झुकलेला कल चिंतेची बाब ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानचा पर्दाफाश! तालिबानने ISIS संबंधावर केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला…

Web Title: Dhaka refused to participate in the celebrations of 150th anniversary of indias meteorological department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
1

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
2

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Devkinandan Thakur: “बाळासाहेब ठाकरे असते तर बांगलादेशात हिंदूंच्या….”, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे परखड मत
3

Devkinandan Thakur: “बाळासाहेब ठाकरे असते तर बांगलादेशात हिंदूंच्या….”, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे परखड मत

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
4

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.