पाकिस्तानचा पर्दाफाश! तालिबानने ISIS संबंधावर केला 'हा' मोठा खुलासा; म्हणाला... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव अधिकच चिघळत चालला आहे. पाकिस्तानच्या तालिबानवरील हल्ला आणि तालिबानचे पाकिस्तानला प्रत्युत्तर सुरुच आहे. तसेच दोन्ही देशांतील वरिष्ठ नेते आणि अधिकारी एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा तालिबानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर मोहम्मद अब्बास सैन काझी यांनी पाकिस्तानवर मोठा खुलासा केला आहे. मात्र, पाकिस्तानने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तालिबानचे उपपरराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद सैन काझी यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानवर तीव्र टिका करत दहशतवादा संबंधावर उघडपणे मोठा खुलासा केला आहे. त्यांनी मुलाखतीत ISIS चे सैन्य पाकिस्तानमध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण घेते आणि नंतर अफगाणिस्तानवर हल्ले करते याबाबत माहिती दिली आहे. तसेच काझी यांनी त्यांच्याकडे यासंबंधित पुरावे असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
दहशतवाद्यांच्या खात्मा करु
काझी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमच्याकडे पुरावे आहेत आणि ISIS पाकिस्तानंमध्ये आपले तळ चालवते, तसेच प्रशिक्षण घेते. याशिवाय, पाकिस्तानकडून त्यांना शस्त्रसाठा देखील पुरवला जातो आणि ते अफगाणिस्तानवर हल्ला करतात.” त्यांनी यावर दु:ख व्यक्त करत म्हटले की, मला खेद वाटतो या सर्वांचे क्रेंद्र पाकिस्तान आहे. मात्र, आम्ही याला घाबरणार नाही, पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत आणि त्यांचा खात्मा करु असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेत समस्या- काझी
याशिवाय, शेर मोहम्मद सैन काझी यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेत समस्या असल्याचे म्हटले. पाकिस्तानने त्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच त्यांनी इस्लामिक अमिरात त्यांना मदत करण्यास तयार असून त्यांना, एक चांगला शेजारी आणि मित्र हवा मिळेल असेही ते म्हणाले. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आमच्याकडून सूचना हव्या असतील तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत अशा तिखट शब्दात त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.
अफगाणिस्तान आणि TTP चा एकत्रित हल्ल्याचा कट
दरम्यान अफगाणिस्तानच्या तालिबानी आणि दहशतवादी संघटना TTP यांनी पाकिस्तानविरोधात संयुक्तपणे हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने TTP सोबत हल्ल्याला मान्यता दिली आहे. या एकत्रित आघाडीमुळे पाकिस्तानसाठी मोठ्या समस्यांचा उगम होऊ शकतो. तालिबानच्या उप-विदेश मंत्र्यांनीही पाकिस्तानला इशारा दिला आहे की अफगाण सैनिक “परमाणु अस्त्रासारखे” आहेत आणि पाकिस्तानला मोठा धक्का देऊ शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लवकरच होणार ट्रम्प-पुतिन यांची भेट; रशिया म्हणाला ‘आम्ही चर्चेसाठी…’