Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅरेबियन देशातील 4-स्टार ‘Viva Wyndham’ रिसॉर्टमध्ये भीषण आग; इटालियन पर्यटकाचा मृत्यू, 1,700 हून अधिक लोकांना सुखरूप वाचवले

Dominican Republic Resort Fire: डॉमिनिकन रिपब्लिकमधील बायाहिबे येथील एका रिसॉर्टमध्ये लागलेल्या भीषण आगीत एका इटालियन महिलेचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने १,७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 20, 2026 | 11:39 AM
dominican republic luxury resort viva wyndham fire italian tourist dead thousands evacuated

dominican republic luxury resort viva wyndham fire italian tourist dead thousands evacuated

Follow Us
Follow Us:
  • लक्झरी रिसॉर्ट खाक, एकाचा मृत्यू
  • १,७०० पर्यटकांना जीवदान
  • वेताचे छप्पर आणि वारा ठरले कारणीभूत

Viva Wyndham Dominicus Beach fire : कॅरेबियन बेटांमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ असलेल्या डॉमिनिकन रिपब्लिकमधून (Dominican Republic) एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. देशाच्या आग्नेय किनारपट्टीवर असलेल्या ला अल्टाग्रासिया प्रांतातील बयाहिबे (Bayahibe) या जगप्रसिद्ध बीच रिसॉर्ट शहरात एका आलिशान फोर-स्टार हॉटेलला भीषण आग लागली. ‘व्हिवा विंडहॅम डॉमिनिकस बीच’ (Viva Wyndham Dominicus Beach Hotel) या आलिशान रिसॉर्टमध्ये लागलेल्या या आगीत ४६ वर्षीय इटालियन महिला पर्यटकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेच्या वेळी रिसॉर्टमध्ये हजारो आंतरराष्ट्रीय पर्यटक उपस्थित होते. अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने कारवाई करत रिसॉर्टमध्ये मुक्कामी असलेल्या तब्बल १,६९० ते १,७०० देशी-विदेशी पर्यटकांना आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना वेळेत सुरक्षित बाहेर काढले आहे. जर बचावकार्यात थोडाही उशीर झाला असता, तर हा अपघात अधिक भीषण ठरला असता.

आगीच्या भीषण ज्वाळा अन् जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या

सोशल मीडियावर या घटनेचे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आणि ड्रोन फुटेज व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये कॅरेबियन समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर आकाशात शेकडो फूट उंच काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा उठताना दिसत आहेत. रिसॉर्टमधील घरे आणि कॉटेजच्या छतांना आगीने पूर्णपणे वेढले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Train Crash: लंडनमध्ये दोन प्रवासी ट्रेनची एकमेकांना भीषण धडक; एकाचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

परिस्थिती इतकी भयावह होती की, आगीच्या तडाख्यातून आणि धुरामुळे होणाऱ्या गुदमरण्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक पर्यटकांना कपड्यांनिशी थेट समुद्राच्या पाण्यात उड्या माराव्या लागल्या. डझनभर पर्यटक समुद्राच्या पाण्यात कंबरेइतक्या पाण्यात उभे राहून असहाय्यतेने आपल्या डोळ्यांसमोर रिसॉर्ट खाक होताना पाहत होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सर्व पाहुण्यांना समुद्रकिनाऱ्याच्या (Shoreline) सुरक्षित भागात एकत्र केले.

बचावकार्य आणि हानीचा तपशील

डॉमिनिकन रिपब्लिकच्या आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरचे (COE) प्रमुख जुआन मॅन्युएल मेंडेझ आणि ‘DAEH’ आपत्कालीन सेवांनी दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, मृत महिलेची ओळख फ्रान्सिस्का व्हॅलेंटिनो (Francesca Valentino – वय ४६, रा. इटली) अशी झाली आहे. या आगीत होरपळल्याने आणि धुराचा त्रास झाल्याने नऊ जण जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जवळच्या अत्याधुनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित ६ जणांवर घटनास्थळीच तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये काही हॉटेल कर्मचारी आणि बचाव पथकातील जवानांचाही समावेश आहे.

ला रोमाना (La Romana) आणि बयाहिबे येथील स्थानिक अग्निशमन दलाच्या किमान १५ हून अधिक गाड्या आणि शेकडो जवानांनी सलग काही तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. रिसॉर्टमध्ये अडकलेल्या १,७०० पाहुण्यांना तातडीने बाहेर काढून जवळपासच्या इतर हॉटेल्स आणि सुरक्षित निवासस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. सुदैवाने, या हॉटेल साखळीचे अगदी शेजारीच असलेले दुसरे रिसॉर्ट ‘व्हिवा विंडहॅम डॉमिनिकस पॅलेस’ (Viva Wyndham Dominicus Palace) आगीपासून पूर्णपणे सुरक्षित राहिले असून, तेथील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Times Square Firing: पर्यटकांची पळापळ अन् किंकाळ्या! टाईम्स स्क्वेअर गोळीबाराने हादरली अमेरिका; थरारक VIDEO आला समोर

A massive fire has ripped through a Dominican Republic beach resort, killing one tourist and forcing the evacuation of almost 1,700 other guests. Authorities are investigating the cause and say the blaze spread quickly due to high winds and the resort’s flammable palm roof. pic.twitter.com/bOexilIdab — Al Jazeera English (@AJEnglish) June 20, 2026

credit – social media and Twitter

का पसरली आग एवढ्या वेगाने?

प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ४-स्टार रिसॉर्टचे सौंदर्य वाढवण्यासाठी कॉटेज आणि मुख्य इमारतीची छप्परे पारंपारिक पद्धतीने ताडाच्या सुकलेल्या पानांपासून आणि वेतापासून (Palm-thatched roofs / Straw roofs) बनवण्यात आली होती. हे साहित्य अत्यंत ज्वलनशील असते.

शुक्रवारी समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग प्रचंड होता. रिसॉर्टच्या एका भागात ठिणगी पडताच, या सुकलेल्या छपरांनी लगेच पेट घेतला आणि वेगवान वाऱ्यामुळे ही आग काही मिनिटांतच संपूर्ण हॉटेल संकुलात पसरली. अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीचे नेमके कारण काय होते शॉर्ट सर्किट की गॅस गळती—याचा सखोल तपास सध्या स्थानिक पोलीस आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने करत आहेत.

पर्यटनावर परिणाम नाही: प्रशासनाचे आवाहन

डॉमिनिकन रिपब्लिक हे जगातील विशेषतः अमेरिका आणि युरोपियन पर्यटकांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे. चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच तब्बल ५६ लाख (५.६ दशलक्ष) आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी या देशाला भेट दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने (COE) पर्यटकांना धीर दिला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बयाहिबे आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन क्रियाकलाप पूर्णपणे सुरक्षित असून ते नेहमीप्रमाणे सुरू आहेत. या एका दुर्दैवी घटनेमुळे देशातील पर्यटनाला कोणताही फटका बसलेला नाही. जागतिक स्तरावर ८,४०० पेक्षा जास्त हॉटेल्सचे जाळे असलेल्या विंडहॅम हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सने (Wyndham Hotels & Resorts) या घटनेवर दुःख व्यक्त केले असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Dominican republic luxury resort viva wyndham fire italian tourist dead thousands evacuated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • America
  • fire Accident
  • World news

संबंधित बातम्या

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
1

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
2

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण
3

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट
4

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.