Iran-Israel War: भारत आणि पाकिस्तामध्ये गेल्या महिन्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील युद्धबंदीची घोषणा केली होती. भारत आणि पाकिस्तानला व्यापारबंदीची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामास मान्यता दिल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज (२४ जून) सकाळी त्यांनी गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले युद्धबंदीची घोषणा केली. इराण-इस्त्रायल युद्धबंदीचे श्रेय स्वत:ला देण्यासाठी आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे. इस्रायल आणि इराण स्वतः त्यांच्याकडे आले आणि शांततेबद्दल चर्चा केली. दोन्ही देशांनी जवळजवळ एकाच वेळी त्यांच्याशी संपर्क साधला आणि शांततेचे आवाहन केले, असा दावा केला.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इराण आणि इस्रायल माझ्याकडे आले आणि म्हणाले की आता त्यांना शांतता हवी आहे. मला लगेच समजले की हीच योग्य वेळ आहे. आता जग आणि मध्य पूर्व हे खरे विजेते आहेत. इस्रायल आणि इराण या दोघांचेही भविष्य प्रेम, शांती आणि समृद्धीने भरलेले आहे. दोन्ही देशांना मिळवण्यासारखे खूप काही आहे, परंतु जर ते सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गापासून दूर गेले तर त्यांना गमावण्यासारखेही खूप काही आहे.”
Iran-Israel War Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्धबंदीची घोषणा पण इराण म्हणतो, कोणताही समझोता नाहीच…
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, त्यांनी दावा केला की इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदी करारामागे एक महत्त्वाची लष्करी कारवाई होती. अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्स, वैमानिक आणि त्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या धैर्य आणि अचूकतेशिवाय हा करार शक्य झाला नसता असे त्यांनी सांगितले.तसेच, एक प्रकारे, संध्याकाळी उशिरा झालेल्या हल्ल्याने सर्वांना एकत्र आणले आणि तेव्हाच करार झाला. ही लष्करी कारवाई शांततेची सुरुवात बनली हे आश्चर्यकारक आहे. असंही त्यांनी नमुद केलं,
इराण आणि इस्रायलमधील संपूर्ण युद्ध रोखण्यासाठी करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देश पुढील २४ तासांत त्यांच्या सध्याच्या लष्करी कारवाया संपवतील, त्यानंतर युद्धबंदी प्रक्रिया सुरू होईल. प्रथम इराण युद्धबंदी लागू करेल, त्यानंतर १२ तासांनंतर इस्रायल देखील त्यात सामील होईल. एकूण २४ तासांनंतर हा संघर्ष अधिकृतपणे संपल्याचे मानले जाईल.
इस्रायल आणि इराणमधील १२ दिवस चाललेले युद्ध आज संपले. इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा शेवट घोषित करण्यात आला. इराण आणि इस्रायलने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. पण युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वी इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. तत्पूर्वी, आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी, इराणने कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हल्ला केला. युद्धबंदीची घोषणा होण्यापूर्वी इराणने कतारच्या दिशेने ६ क्षेपणास्त्रे डागली, जी अमेरिकन लष्करी तळावर पडली आणि ती नष्ट झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला युद्धबंदीची माहिती देणारे पहिले होते.
इतकेच नव्हे तर, मंगळवारी सकाळी इराणने इस्रायलच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागली, ज्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेबाबत इस्रायलने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. इराण-इस्रायल युद्धात ट्रम्प कार्ड अपयशी ठरले आहे का? कारण युद्धबंदीनंतरही इराणने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यात अनेक लोक मारले गेल्याचे सांगितले जात आहे.