फोर्डोवर अमेरिकेचा हल्ला अयशस्वी; अमेरिकेकडून नवे बंकर बस्टर बनवण्याचा निर्णय
Iran-Israel war update: इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर ही घोषणा केली.
“सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदी झाली आहे,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले.तसेच ही युद्धबंदी पुढील सहा तासांत लागू होणार असून, सुरुवात इराणकडून होईल. इस्रायल १२ तासांनंतर औपचारिकपणे सामील होईल आणि एकूण २४ तासांनंतर युद्ध संपल्याचे अधिकृतपणे मानले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पणइस्रायल सरकारकडून मात्र या युद्धबंदीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
Rain Update : पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, युद्धजन्य वातावरण थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू होणार असल्याची घोषणा केली असली, तरी इराणकडूनदेखील कोणतीही स्पष्ट आणि अंतिम सहमती मिळालेली नाही. यामुळे दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थितीवर अनिश्चिततेचे मळभ कायम आहे.
ट्रम्प यांनी सोमवारी रात्री त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “पुढील सहा तासांत युद्धबंदी लागू होईल. प्रथम इराण आपले हल्ले थांबवेल आणि त्यानंतर १२ तासांनी इस्रायलही आपल्या कारवाया थांबवेल.” तसेच, ही युद्धबंदी कायमस्वरूपी लागू राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणने तात्काळ प्रतिक्रिया देत त्याला खुली पुष्टी दिलेली नाही. इराणचे परराष्ट्र उपमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, “इस्रायल आणि इराणमध्ये कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही.” अराघची यांनी सांगितले की, “इस्रायलने जर तेहरान वेळेनुसार पहाटे ४ वाजेपर्यंत इराणी लक्ष्यांवर हल्ले थांबवले, तर इराण त्यावर प्रत्युत्तर देणार नाही.” मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की, “इराण आपले लष्करी अभियान पूर्णपणे थांबवेल की नाही, याचा अंतिम निर्णय नंतर घेण्यात येईल.” या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेला आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये उत्सुकतेने पाहिले जात असले तरी, प्रत्यक्षात दोन्ही देशांत स्थायी युद्धबंदी होणार की नाही, हे आगामी तासांत स्पष्ट होणार आहे.