मोठी बातमी ! अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा; 'या' देशाची महत्त्वपूर्ण भूमिका (फोटो- सोशल मीडिया)
तेल अवीव : मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांत मोठा संघर्ष सुरू होता. इस्त्रायल आणि अमेरिका इराणला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच अमेरिकेने देखील या युद्धात उडी मारली होती. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणनेही कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवला. त्यानंतर या सर्व घडामोडींनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध संपल्याने संपूर्ण पश्चिम आशियाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली असली तरी, इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवण्यात कतारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अरब देश कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धबंदीसाठी इराणचे मन वळवले आहे. युद्धबंदीमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल ट्रम्प यांनी कतारच्या प्रमुखांचेही आभार मानले आहेत.
अहवालानुसार, ट्रम्प यांनी कतारच्या प्रमुखांना सांगितले की, इस्रायलने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अशा परिस्थितीत, त्यांनी इराणलाही लढाई थांबवण्यास राजी करावे जेणेकरून हा संघर्ष संपेल. यानंतर लगेचच, कतारच्या पंतप्रधानांनी इराणी सरकारशी बोलणी केली आणि तेहरानकडून युद्धबंदीच्या अटींसाठी वचनबद्धता मिळवण्यात यश मिळवले. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने कबूल केले की तेहरानने कतारच्या मध्यस्थीने केलेला युद्धबंदी स्वीकारला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्याने इराणही चांगलाच खवळला
अमेरिकेने हल्ला केल्याने इराण चांगलाच खवळला. अमेरिकेने इराणच्या अणूकेंद्रांवर भीषण हल्ले केले होते. त्या प्रत्युत्तर इराणने सिरियामध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्यावर देखील हल्ले केले. मात्र, पुढील 48 तासांत इराण अमेरिकेवर प्रचंड मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिका हाय अलर्ट मोडवर आल्याचेही समोर आले होते.