आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची ट्रम्प प्रशासनात एन्ट्री; 'या' पदासाठी करण्यात आली नियुक्ती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात आणखी एका भारतीय वंशांच्या व्यक्तीची प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे हॅरी कुमार यांची ट्रम्प प्रशासनात वाणिज्य विभागात (Department of Commerce) असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी निवड केली आहे. अमेरिकन कॉंग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2025 रोजी त्यांचे नामांकन करण्यात आले होते.
हॅरी कुमार वाणिज्य विभागाच्या असिस्टंट सेक्रेटरी कुमार सुझी फेलिझ यांची जागा घेणार आहेत. अमेरिकेच्या आर्थिक धोरण, व्यापारतील करार आणि व्यावसायिक विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला मदत करतील. सध्या हॅरी कुमार अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या कार्यलयात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सल्लागार म्हणून ते आर्थिक धोरण, व्यापार करार आणि व्यवसाय विकासाला चालना देण्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर धोरणात्मक सल्ला देतात.
मीडिया रिपोर्टनुसार, हॅरी कुमार टेक्साच्या ब्यूमोंट शहरात त्यांचा जन्म झाले असून तेथील रहिवासी आहेत. त्यांचे पालक डॉ. नॅट आणि डॉ. सकू कुमार नेहमीच हॅरी कुमार यांच्या शिक्षणाला प्राधन्य दिले आहे. हॅरी कुमार यांचे शिक्षण टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठातून झाले आहे. या विद्यापीठातून त्यांनी राजशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी टेक्सास टेक विद्यापीठ स्कूल ऑफ लॉमधून कायद्याची पदवी घेतली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हॅरी कुमार यांनी कॅपिटल हिलमधून अमेरिकन प्रतिनिधी रँडी वेबर यांच्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. येथून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर हॅरी यांनी वॉशिंग्टन डी. सी येथे अमेरिकन सिनेटर मार्को रुबियो यांचे धोरण सल्लागार म्हणून काम केले. सिनेटमधील कार्याव्यतिरिक्त हॅरी यांनी ली-सायकल(Le- Cycle) या कंपनीमध्ये सरकारी सहाय्यक संचालक म्हणून कामकाज पाहिले.
सध्या अमेरिकन सीनेटच्या वाणिज्य, विज्ञान आणि वाहतूक विषयक समिती त्यांच्या नामांकनाचा आढावा घेत आहे. हॅरी कुमार यांचे नाव सीनेटच्या कार्यकारी कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, परंतु अंतिम मंजुरी मिळालेली नाही. हॅरी कुमार यांच्या कामाचा क्रयभार निश्चित झाल्यावर, अमेरिकेच्या व्यापर धोरण, आर्थिक धोरण आणि आर्थिक सुधारणा आणि व्यावसायिक संंधींवर त्यांच्या मोठ्या प्रभाव राही. भारतीय वंशांच्या आणखी एका व्यक्तीसाठी ही मोठी संधी म्हटली जात आहे.