Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन सैन्यात मोठा बदल; ट्रम्प प्रशासनाचा ट्रान्सजेंडर्सना वगळण्याचा निर्णय?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ट्रम्प प्रशासनात आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेतील LGBTQIA+ समुदायावर मोठा बदल करण्याची तयारी करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2024 | 07:20 PM
अमेरिकन सैन्यात मोठा बदल; ट्रम्प प्रशासनाचा ट्रान्सजेंडर्सना वगळण्याचा निर्णय?

अमेरिकन सैन्यात मोठा बदल; ट्रम्प प्रशासनाचा ट्रान्सजेंडर्सना वगळण्याचा निर्णय?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ट्रम्प प्रशासनात आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेतील LGBTQIA+ समुदायावर मोठा बदल करण्याची तयारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प लवकरच एक कार्यकारी आदेश लागू करण्या असून याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेच्या सैन्यातून सर्व ट्रांसजेंडर सदस्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रान्सजेंडर्सना सैन्याच्या सेवेपासून वगळण्यात येणार

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या आदेशात, ट्रान्सजेंडर सैन्याच्या सेवेपासून “अयोग्य” ठरतील आणि त्यांना चिकित्सकीय दृष्ट्या सेवा देण्यात येणार नाही. याआधीच्या कार्यकाळात देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सैन्यात ट्रान्सजेंडर सदस्यांना सामील करण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, त्यावेळी सैन्यात आधीपासून कार्यरत असलेल्या ट्रान्सजेंडर्सना त्या सेवेत राहण्याची मुभा देण्यात आली होती.

मात्र, नवीन आदेशानुसार, सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व ट्रांसजेंडरांना बाहेर काढण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या निर्णयाचा परिणाम सुमारे 15,000 ट्रान्सजेंडर सैनिकांवर होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, जो बाइडन यांच्या अध्यक्षतेत ट्रम्पच्या त्या बंधनांची छटा हटविण्यात आली होती. तसेच ट्रान्सजेंडर्सना खेळापासून दूर ठेवण्यात देखील ट्रम्प यांनी निर्णय घेतला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तुर्कीतील विमानतळावर रशियन विमानाला भीषण आग; घटनेचा VIDEO व्हायरल

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

निवडणुक प्रचारदरम्यान देखील ट्रान्सजेंडर मुद्द्यावर चर्चा

ट्रम्प यांनी एका प्रमुख दृष्टिकोनातून, अमेरिकेला कथित “जागृती” आणि “वामपंथी विचारधारा”पासून मुक्त करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटले होते की, “तांत्रिक आणि अन्यायपूर्ण शिकवणींचे विरोध करणारे शाळा आणि संस्थांना निधी कमी करावा.” ट्रान्सजेंडर खेळाडूंना मुलींच्या खेळांमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचीही मागणी त्यांनी केली होती. तसेच लिंग ओळखीवरील शालेय पाठ्यक्रमांवर बंदी घालण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.

ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांच्या समावेशामुळे अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम

ट्रम्प यांच्या या निर्यावर त्यांच्या बाजूने पीट हेगसेथ या व्यक्तीने वकिली केली आहे. त्यांनी अमेरिकेतील सैन्यात महिला आणि ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांच्या समावेशामुळे अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हेगसेथ यांच्या मते, या पावलांमुळे सैन्याची कार्यक्षमता आणि सुरक्षितता कमी होईल. यामुळे ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 20 जानेवारी 2025 रोजी हा आदेश जारी करू शकतात असा अंदाज बांधला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागात विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

Web Title: Donald trump plans to expel transgenders from us military nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी
1

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध
2

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
3

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
4

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.