फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अंकारा: तुर्कीच्या दक्षिण भागातील अंतल्या विमानतळावर एक मोठा अपघात टळला. विमानतळावर एका रशियन विमानतळाला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने लॅंडिंग केल्यानंतर त्याच्या इंजिनला आग लागली. या विमानामद्ये एकूण 95 लोक होते. त्यापैकी 89 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांचा समावेश होता. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तुर्कीच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
तात्काळ आग विझवण्यात आली
घटना रविवारी रात्री 9:34 वाजता घडली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एक रशियन एव्हिएशन कंपनीचे ‘अझिमुथ एअरलाईन्स’ द्वारे चालवलेले जाणारे ‘सुखोई सुपरजेट 100’ विमान अंतल्या विमानतळावर उतरले. विमान सोची, रशिया येथून उड्डाण घेत होते.
विमानाच्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग लवकर विझवण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या विमानाला आग का लागली या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून यामागचे कारण अद्याप स्षष्ट करण्यात आलेले नाही.
घटनेचा व्हिडिओ
विमानात असलेल्या प्रवाशांचे एक व्हिडिओ समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. काही प्रवासी त्यांच्या सामानासह विमानातून बाहेर पडताना दिसले. एव्हिएशन न्यूज वेबसाइट ‘एअरपोर्ट हेबर’ ने या व्हिडिओची पोस्ट केली आहे. यामध्ये विमानाच्या डाव्या बाजूने आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Eus şirket Azimuth’a ait Sukhoi Superjet 100 tipi yolcu uçağının Antalya Havalimanı’nda motorunun yandığı anlar bir yolcu tarafından kaydedildi.
Olayda herhangi bir yaralanma bildirilmedi. pic.twitter.com/umoa6KdVL8
— AirportHaber (@AirportHaber) November 24, 2024
हवाई वाहतुकीवर परिणाम
या घटनेमुळे विमानतळावर हवाई वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. विमानतळाच्या बचाव आणि नियंत्रण यंत्रणांनी घटनास्थळी तातडीने कार्यवाही केली. विमानाची धावपट्टीवरून काढून नेण्याचे काम सुरू आहे, आणि विमानतळावर अन्य विमानांची आगमनाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. लष्करी धावपट्टीवरून विमाने निर्गमन करत आहेत. सध्या आगीचे कारण कळू शकलेले नाही, आणि या घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.