Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Warns China : इराणला मदत करणं चीनला पडणार महागात; ट्रम्प यांनी दिला ड्रॅगनला थेट इशारा

Donald Trump warning : इराणशी वाढत्या तणावात ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा दिला आहे. चीन इराणला शस्त्रे पुरवत असल्याचा दावा समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्पने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 12:22 PM
Trump Warns China

Trump Warns China

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा
  • इराणला शस्त्र पुरवठा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील
  • अमेरिका इराण वाद पुन्हा पेटला
Donald Trump Warns China : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिका इराण यांच्या सुरु असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनला कडक शब्दांत इशारा दिला आहे. नुकतेच चीन इराणला गुप्तपणे शस्त्र पुरवठा करत असल्याचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, चीनने इराणला शस्त्र पुरवठा केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा

ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि इराणमध्ये सखोल चर्चा सुरु आहे. परंतु बाह्य हस्तक्षेपामुळे यामध्ये अडथळा येत आहे. यामुळे त्यांनी चीन(China) ला थेट इशारा देत बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. या संघर्षात चीनने इराणला शस्त्रे पुरवल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागले आणि यामध्ये विजय अमेरिकेचाच होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

चीनने फेटाळला दावा

दुसरीकडे वॉशिंग्टन येथील चीनच्या दूतावासाने इराणला शस्त्र पुरवठ्याचा दावा फेटाळून लावला आहे. दूतावासाने स्पष्ट केले आहे की,  चीनने कोणत्याही देशांना शस्त्रास्त्रे दिलेली नाहीत. अमेरिकेने पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करुन नयेत असे चीनने म्हटले आहे. परंतु दुसरकीडे इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यासाठी चीनच्या प्रगत क्षेपणास्त्रांचा वाप केल्याचा दावा केला जात आहे. इराणकडूनही त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान असल्याचे संकेत मिळाले आहेत.

इस्लामाबाद चर्चा फिस्कटली

दुसरीकडे या इशाऱ्या दरम्यान अमेरिका इराण शांतता चर्चा (US Iran Peace Talks) फिस्कटली असून अमेरिकेचे शिष्टमंडळ परण्याच्या मार्गावर आहे. उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २१ तास सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे.

यामुळे सध्या मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग पुन्हा गडद झाले आहेत. पुन्हा अमेरिका इराण युद्ध (US Iran War) पेट घेण्याची शक्यता असून आखाती देशांवर हल्ल्याची भीती वाढली आहे. यामुळे जागतिक स्तरावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

स्ट्रेट ऑफो होर्मुझमधील तणाव शिगेला

याच वेळी स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्येही पुन्हा तणाव वाढला आहे. इराणने होर्मुझ मार्गावर सुरुंग आणि माइन्स पेरल्या असून याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने माइन स्वीपर्स तैनात करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने मार्ग सुरुक्षित करण्याचा दावा केला असून इराणने या मार्गावरुन अद्याप एकही अमेरिकन जहाज गेले नसल्याचे म्हटले आहे.

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी चीनला काय इशारा दिला?

    Ans: ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा देत म्हटले की, चीनने इराणला शस्त्र पुरवठा केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

  • Que: अमेरिकेच्या दाव्यावर चीनने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: चीनने कोणत्याही पक्षाला शस्त्रास्त्रे पुरवली नसल्याचे वॉशिंग्टन येथील चीनी दूतावासाने म्हटले आहे. तसेच अमेरिकेने कोणत्याही पुरव्याशिवाय आरोप करु नयते असेही स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

Web Title: Donald trump warns china over weapons supply to iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
1

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी
2

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी

US Tariff Threat : ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ डाव; रशियन तेल खरेदीवरुन भारत पुन्हा निशाण्यावर
3

US Tariff Threat : ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ डाव; रशियन तेल खरेदीवरुन भारत पुन्हा निशाण्यावर

HICDP Project: बौद्ध संस्कृतीचे रक्षण आणि ड्रॅगनला वेढा? नेपाळच्या दुर्गम भागात भारताचा 33 दशलक्षचा सांस्कृतिक प्रकल्प सुरू
4

HICDP Project: बौद्ध संस्कृतीचे रक्षण आणि ड्रॅगनला वेढा? नेपाळच्या दुर्गम भागात भारताचा 33 दशलक्षचा सांस्कृतिक प्रकल्प सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.