ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट करत इराणला सावधानतेचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी पुन्हा दारुगोळा भरला आहे. करार होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणभोवती तैनात राहील. कराराचे पालन न झाल्यास, होर्मुचा मार्ग खुला न केल्यास गोळीबार केला जाईल. इराण यापूर्वी कधीही पाहिला नसलेला शक्तिशाली आणि अधिक तीव्र विनाश पाहील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत असाही इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरता पसरली आहे.
याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी देखील युद्धविरामामाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला तरी कोणत्या क्षणी पुन्हा युद्धासाठी इस्रायल (Israel) पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, आतापर्यंतच्या युद्धात त्यांच्या सैन्याने अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य केली आहे. याच वेळी इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील असाही इशार नेतन्याहूंनी दिली आहे.
दरम्यान इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) बंद केला आहे. यामुळे जगभरात इंधन दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणने वारवार इशार दिला होता, लेबनॉनवरी हल्ले थांबले नाहीत तर याचे अमेरिका-इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दुसरीडे ट्रम्प यांची धमकी आणि १० कलमी प्रस्तावाला केराची टोपली ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या अचानक यु-टर्नमुळे जगभरात गंभीर चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी इराण(Iran)च्या प्रस्तावाला अयोग्य म्हटले असून युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याचा इशारा इराणला दिला आहे.
Ans: अमेरिका इराण युद्धविराम चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लाबाद येथे शुक्रवारी (१० एप्रिल) होणार आहे.
Ans: इस्लामाबद चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी इराणभोवती त्यांचे सैन्य तैनात राहतील असे म्हटले आहे. इराणकडून करार न झाल्यास, अटींटचे पालन न झाल्यास त्यांच्यावर लष्करी कारवाई केली जाईल असा थेट इशारा ट्रम्प यांनवी दिला आहे.
Ans: इस्रायलने देखील लेबनॉनवरील हल्ले न थांबवण्याचे आणि करार न झाल्यास युद्धसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.






